Dhule News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारींतर्गत जिल्हा पोलिस प्रशासनाने विविध उपाययोजनांना वेग दिला आहे. यात जिल्हाभरातील सर्व पोलिस ठाण्यांत बुधवारी (ता. ७) एकूण दोनशेहून अधिक गुन्हेगार, संशयित, समाजकंटकांची हजेरी घेत अधिकाऱ्यांनी त्यांना कायदा व सुव्यवस्थेविषयी सूचक तंबी दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील १४८ ‘हिस्ट्रिशीटर्स’ची गुरुवारी (ता. ८) पोलिस अधीक्षक कार्यालयात सकाळी दहानंतर परेड घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. (Superintendent of Police Dhiware statement Todays presence of History Sheeters in Dhule news)
तीन वर्षांपासून पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातील शारीरिक दुखापत करणारे आरोपी, जे निवडणुकीच्या कालावधीत कायदा हातात घेऊ शकतात असे आरोपी.
संशयित, गुन्हेगार, समाजकंटक, मागील तीन वर्षांतील आरोपींचे गटातील वैरभाव आणि पूर्वी ८० व आता १४८ झालेले हिस्ट्रिशीटर्स अशा सर्वांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
त्यात प्रतिबंधात्मक कारवाई करणे, तंबी देणे यासह विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. याअंतर्गत जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांत बुधवारी दिवसभरात दोनशेहून अधिक गुन्हेगार, संशयित, समाजकंटकांची परेड घेऊन त्यांना सूचक तंबी देण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस यंत्रणा सतर्क असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, हिस्ट्रिशीटर्स, तसेच अट्टल गुन्हेगारांना गुरुवारपासून सकाळी दहानंतर संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये हजेरी द्यावी लागणार आहे, तशी सूचना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात व्हावी यासाठी गृह विभागाने पोलिस दलास विशेष सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे सामान्य जनतेच्या मनातून भीती दूर व्हावी हा हेतूही या परेडमागे आहे.
पोलिसांनी हल्लेखोर, टोळीयुद्ध करणारे, निवडणुकांमध्ये दंगा करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यात दीडशेहून अधिक जणांचा समावेश आहे. पोलिस उपअधीक्षकांच्या देखरेखीत गुन्हेगारांची परेड होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.