Superintendent of Police Praveen Kumar Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : तशा ‘मेसेजेस’पासून दूरच राहा पोलिस अधीक्षक पाटील यांचे आवाहन

रमाकांत घोडराज

धुळे : विविध सोशल मीडिया साईट्सवरून (Social Media Sites) येणाऱ्या कर्ज (Debt) उपलब्धतेबाबतच्या मेसेजच्या (message) माध्यमातून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, अशा मेसेजेसपासून दूरच राहावे असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केली आहे. (Superintendent Patils appeal to stay away fake loan messages Dhule News)

व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp), फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (instagram), लिंक्स (Links), अ‍ॅप (App) व इतर मॅसेजद्वारे ऑनलाइन कर्ज (Online Loan) देण्याबाबत माहिती देण्यात येत आहे. गरजू लोक त्यांच्या गरजेनुसार ऑनलाइन माहिती भरून कर्जाची मागणी करतात. त्यानंतर संबंधित सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) इन्शुरन्स फी (Insurance fee), टॅक्स फी (Tax Fee) आदी वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरण्यास सांगतात. लोकांनी भरलेले पैसे स्वीकारून कर्ज मात्र देत नाहीत. नंतर फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. काही अ‍ॅप्सद्वारे दहा ते वीस हजारांचे कर्ज दिले जाते. नागरिक संबंधितांच्या सांगण्यानुसार कर्जाचे हप्ते भरून परतफेड करतात. मात्र, समोरून सांगितले जाते, की आम्हास पैसे परत मिळाले नाही.

तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे भरले आहेत. त्यानंतर कर्ज घेणाऱ्यांच्या संपर्क यादीमधील नातेवाईक तसेच मित्रांना कर्ज घेणाऱ्याची बदनाम करणारे फोन व मेसेजेस केले जातात. अशा प्रकारे लोकांची बदनामी होऊन स्वास्थ खराब होते. कोणत्याही लिंक व अ‍ॅप्सची विनंती स्वीकारताना अलाऊ किंवा ॲक्सेप्ट ऑप्शनवर क्लिक केल्यावर संबंधितांच्या गॅलरीमधील फोटो व कॉन्टॅक्ट लिस्टचा अ‍ॅक्सेसही समोरच्या सायबर गुन्हेगारास प्राप्त होतो. ते या माहितीचा दुरुपयोग करतात, ब्लॅकमेल करून त्रास देतात. अशाप्रकारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी दक्षता बाळगावी. जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकवू नये असे आवाहन पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT