Dhule News: पतीचे निधन झालेल्या विधवेशी लग्न करून नाशिक येथील शिक्षक सुरेश घरटे या शिक्षकाने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
सामोडे (ता. साक्री) येथील नाशिक येथे शिक्षक म्हणून कार्यरत शिक्षक सुरेश घरटे यांच्या पत्नीचे कोरोना काळात निधन झाले. (Suresh Gharte got married to widow dhule news)
मुली, एक मुलगा असूनदेखील कुसुंबा येथील विधवा पूनम भरत रायते या महिलेशी लग्न करून समाजापुढे नवा आदर्श घातला आहे. महिला विधवा असली की समाजाचे टोमणे व समाजात वावरताना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
महिलेला पतीचा आधार व मुलींना वडिलांची साथ मिळाल्यामुळे व तिकडेदेखील घरटे परिवारातील मुलगा व मुलींना आई मिळाली आहे. यामुळे परिवार सुखावला आहे. समाजाच्या अनिष्ट रूढी व परंपरांना फाटा देत धुळे येथील दुय्यम निबंधक नावनोंदणी विभागात रजिस्टर पद्धतीने लग्न लावण्यात आले. नवीन संसार उभा करण्यासाठी पती-पत्नीची साथ महत्त्वाची असते. यामुळे दोघांनाही एकमेकांना आधार झाला आहे.
न्याहळोद येथील माजी उपसरपंच देवीदास जिरे व कुसुंबा येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक दिलीप रायते कुसुंबा, गुलाब घरटे सामोडे, देवाआण्णा यांनी मध्यस्थी करून विवाहयोग जुळवून आणला.
धुळे येथील नोंदणी विवाह विभागात पूनम रायते यांच्यातर्फे देवीदास जिरे (न्याहळोद), पंढरीनाथ एखंडे (पिंपळनेर), तर वर सुरेश घरटे यांच्यातर्फे गुलाब घरटे, सुरेश रायते (कुसुंबा), शिवदास रायते (न्याहळोद) आदींनी स्वाक्षऱ्या करून दोघांना विवाहबंधनात अडकविले.
यामुळे सर्वत्र घरटे शिक्षक यांचे कौतुक होत आहे. या वेळी माजी सरपंच देवीदास जिरे, दिलीप रायते, निवृत्त सीएसआय गुलाब घरटे, शिवदास जिरे, कलाबाई रायते, ढगूबाई जिरे, कमलबाई गवळी, नीता बाई राहते यांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.