Scaffolds built for counting animals in the forest.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Buddha Purnima 2023 : तळोदा वनक्षेत्रात बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणिगणना

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तळोदा वन विभागाच्या माध्यमातून शुक्रवारी (ता. ५) बुद्धपौर्णिमेच्या रात्री तळोदा वनक्षेत्रात आढळणाऱ्या विविध प्राण्यांचे सर्वेक्षण करीत त्यांची गणना करण्यात येणार आहे. (Surveying various animals found in Taloda forest area on night of Buddha Purnima nandurbar news)

प्राणिगणनेसाठी वन विभागाने तयारी केली असून वाल्हेरी, बन, गढावली अशा तीन ठिकाणी मचाण बांधण्यात आली आहेत. प्राणिगणनेत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे वन्यप्राण्यांची आजची स्थिती समोर येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वांचे विशेषतः प्राणिमित्रांचे याकडे लक्ष लागून आहे.

वनक्षेत्रातील प्राण्यांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणिगणना करण्यात येते. त्यानुसार यंदादेखील तळोदा वन विभागाकडून शुक्रवारी (ता. ५) रात्री तळोदा वनक्षेत्रात प्राणिगणना करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वन विभागाने नियोजन केले असून, वाल्हेरी, बन, गढावली आदी ठिकाणी मचाण बांधण्यात आली आहेत.

वन विभागाकडून मचाणाजवळील पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांचे सर्वेक्षण करीत, प्राण्यांची सविस्तर माहिती नोंदविण्यात येणार आहे. प्राण्यांची विष्ठा, ठशांचा अभ्यास करणे आदी पारंपरिक पद्धतीसोबतच कॅमेरा ट्रॅपिंग मेथडचा वापर करीत वन्यप्राण्यांची गणना करण्यात येणार आहे.

यासाठी तळोदा वन विभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळोद्याचे वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनपाल वासुदेव माळी, अपर्णा लोहार, भारती सयाईस तसेच वनरक्षक ज्योती खोपे, गिरधन पावरा, जान्या पाडवी व वनकर्मचारी परिश्रम घेत आहेत.

दरम्यान, तळोदा वनक्षेत्रात मुख्यतः अस्वल, बिबटे, तरस, कोल्हा, मोर, रानमांजर, रानडुक्कर आदी प्राणी आढळून येतात. शुक्रवारी होणाऱ्या प्राणिगणनेत या प्राण्यांच्या संख्येवर वाढलेल्या मानवी हस्तक्षेपाचा किती परिणाम झाला आहे, गेल्या वर्षभरात या वन्यप्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली, प्राण्यांचा संचार व त्यांचे क्षेत्र त्याचबरोबर नवीन एखादा प्राणी वनक्षेत्रात दाखल झाला का, अशा विविध प्रश्नांची ठोस व सध्याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे या प्राणिगणनेकडे सर्वांचे विशेषतः प्राणिमित्रांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्राणिगणना बुद्धपौर्णिमेला का होते?-

बुद्धपौर्णिमा ही उन्हाळ्यातील सर्वाधिक प्रकाश असलेली रात्र असते. उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात व त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो. अशा वेळी ज्या ठिकाणी पाणी असते त्या ठिकाणी प्राणी आवर्जून जातात. त्यामुळे जंगलातील प्राणी पाणवठ्यावर एकदा तरी पाणी पिण्यासाठी येतील या हिशेबाने पाणवठ्याच्या शेजारी मचाण बांधून बुद्धपौर्णिमेच्या सर्वाधिक प्रकाशात प्राण्यांच्या नोंदी घेणे सोपे जाते. त्यामुळे बुद्धपौर्णिमेला प्राणिगणना केली जाते.

"वन विभागाचे कर्मचारी पाणवठ्यांवर येणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी करणार आहेत. प्राणीगणनेत प्राण्यांची जात, प्राण्यांची येण्या-जाण्याची वेळ, नर किंवा मादी, त्यांचा संचार अशा विविध बाबींची नोंद घेतली जाणार आहे." -स्वप्नील भामरे, वनक्षेत्रपाल, तळोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT