crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सिनेस्टाईल पाठलागाने संशयित दरोडेखोरांना अटक; मोठा अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दरोड्याच्या जय्यत तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून शहर पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. दोन संशयित मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

संशयितांकडून जप्त साहित्य लक्षात घेता त्यांचा शहरात मोठ्या दरोड्याचा कट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.( Suspected robbers arrested in cinestyle by police dhule crime news)

शहराच्या सीमेवरील शनिमंदिराजवळ बुधवारी (ता. १) पहाटे पोलिसांनी संशयितांना वाहनासह अटक केली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम आगरकर यांना काही संशयित शहरात शस्त्रसाठ्यासह दाखल झाल्याची माहिती मिळाली होती. आगरकर यांनी सहकाऱ्यांना निर्देश देऊन शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर पथके नेमून पाळत ठेवली.

महामार्गालगत सावळदे (ता. शिरपूर) फाट्यावर तैनात पथकाला मारुती सुझुकी कार (एमएच ३९, एबी ८१९३)चा संशय आला. त्यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला; परंतु चालकाने वाहन भरधाव शिरपूरच्या दिशेने पळविले. शिरपूर-खर्दे बुद्रुक सीमेवर शनिमंदिराजवळ पोलिसांनी शिताफीने वाहन आडवे लावून संशयितांना थांबण्यास भाग पाडले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून गेले. अन्य तीन जण पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी पोलिसांचे कौतुक केले. पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक गणेश कुटे व सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

दरोड्याचे साहित्य जप्त

संशयितांना कारसह शहर पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांनी झडती घेतली. कारमध्ये तलवार, चाकू, लोखंडी कटर, लोखंडी हातोडी, टॅमी, पकड, मिरचीपूड, प्लॅस्टिकच्या गोण्या, दोन धारदार कटर, सुती दोरी असे साहित्य आढळले. संशयितांनी कार चोरल्याचाही संशय आहे. शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने प्रवेश करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला.

संशयितांमध्ये मुकद्दरसिंह निक्कासिंह टाक (वय ३८, रा. बीबी, ता. लोणार, जि. बुलडाणा), तकदीरसिंह टिट्टूसिंह टाक (२४, रा. मंगलबाजार, जालना) व कलदारसिंह निक्कासिंह टाक (५५, रा. गुरू गोविंदनगर, जालना) यांचा समावेश आहे. उर्वरित दोघांचाही शोध सुरू आहे. या कारवाईत कारसह एकूण पाच लाख ६२० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT