Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: ...तर देवपूरकरांकडून ‘ती’ रक्कम वसूल होणार; मालमत्तांना सुधारित कर आकारणीची प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सुधारित मालमत्ता करयोग्यमूल्य निर्धारणाच्या प्रक्रियेत धुळे महापालिकेतर्फे शहराच्या देवपूर भागातील मालमत्ताधारकांकडून प्राप्त सुनावणीच्या हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, उर्वरित शहराच्या सुनावणीचे काम अद्याप बाकी असल्याने देवपूरकरांकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात जुन्या बिलाप्रमाणेच करवसुली होत आहे.

मात्र, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन आकारणीनुसार संबंधितांकडे ‘जादा’ रक्कम निघत असल्यास ती महापालिकेकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी बिलांवर ‘सब्जेक्ट टू रिव्हीजन’ असा शिक्का मारण्यात आला आहे.

हद्दवाढ क्षेत्रातील प्रक्रिया पूर्ण झाल्याने येथील मालमत्ताधारकांकडून नव्या आकारणीनुसारच करवसुली सुरू आहे. (tax amount will be recovered from Devpur pople Procedure for Revised Taxation of Properties Dhule News)

धुळे महापालिकेने हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरातील मालमत्तांचे सुधारित करयोग्यमूल्य निर्धारणाची प्रक्रिया सुरू केली. यात स्थापत्य कंपनीकडून मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण (मोजमाप) करण्यात आले.

हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने सुधारित कर आकारणी केली. त्यासाठी मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या, यात प्रथमतः हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांच्या सुनावणीचे काम पूर्ण झाले.

त्यामुळे चालू आर्थिक वर्षापासूनच हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून नवीन कर आकारणीनुसार करवसुली सुरू आहे.

देवपूर भागाचे कामही पूर्ण

हद्दवाढ क्षेत्रानंतर महापालिकेने उर्वरित शहरातील मालमत्ताधारकांना नवीन करआकारणीनुसार करयोग्यमूल्य निर्धारणाच्या नोटिसा बजावल्या व त्यावर हरकती-सूचना मागविल्या. या प्रक्रियेत देवपूर भागातून एकूण सात हजार २५५ हरकती दाखल झाल्या.

या हरकतींवर सुनावणीचे काम काही दिवसांपासून महापालिकेत सुरू होते. सर्व सात हजार २५५ हरकतींच्या सुनावणीचे कामही आता पूर्ण झाले आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष हरकतीच्या सुनावणीदरम्यान एक हजार ४०६ हरकतदार सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे प्रत्यक्षात पाच हजार ८४९ हरकतींवर कामकाज पूर्ण झाले. या सर्व हरकती आता निकाली निघाल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उर्वरित शहरातही नोटिसा

देवपूर भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून आता उर्वरित शहरातील मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू होईल.

यात साक्रीरोड, पेठ भाग व चाळीसगाव रोड असे भाग करण्यात आले आहेत. या भागातील मालमत्ताधारकांना करयोग्यमूल्य निर्धारणाच्या नोटिसा बजावल्या जातील.

प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच करवसुली

देवपूर भागातील सुनावणीचे काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित शहरातील मालमत्ताधारकांना नोटिसा देणे व त्यावर सुनावणी घेण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. उर्वरित शहरातील प्रक्रियाही पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण शहरातील मालमत्ताधारकांकडून नवीन आकारणीनुसार करवसुलीची प्रक्रिया सुरू होईल.

त्यामुळे देवपूर भागातील प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी त्यांच्याकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात जुन्या बिलाप्रमाणेच करवसुली सुरू आहे. मात्र, या बिलांवर ‘सब्जेक्ट टू रिव्हीजन' असा शिक्का मारण्यात आला आहे.

अर्थात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कर आकारणीनुसार संबंधित मालमत्ताधारकांकडे जादा कर निघत असेल तर तो कर नंतर वसूल केला जाणार आहे. त्यामुळे एका अर्थाने २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षातच धुळेकरांकडून नवीन करानुसार वसुली सुरू झाली आहे. हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून नव्या करानुसारच वसुली सुरू आहे.

देवपूर भागातील हरकतींची स्थिती

-एकूण प्राप्त हरकती........७२५५

-सुनावणीला हजर..........५८४९

-सुनावणीला गैरहजर.......१४०६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT