police bribe sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe Crime : लाचखोरीमुळे ‘ट्रॅफिक’चा पुरता विचका!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेचा अंकुश नसल्याने प्रत्येक रस्त्यालगत असंख्य अनधिकृत बांधकामे आणि दुतर्फा वाढती अतिक्रमणे, तसेच शहर वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेचा कुठलाही वचक, धाक नसल्याने शहरात ‘ट्रॅफिक’चा विचका झाल्याचे कुणीही अमान्य करू शकत नाही. (team of anti corruption department arrested traffic controller constable in bribery case dhule bribe news)

त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील पथकाने ट्रॅफिक नियंत्रक हवालदाराला लाच प्रकरणी अटक करत शिक्कामोर्तब केला. लाचखोरीच्या या प्रकारामुळे शहर वाहतूक नियंत्रण पोलिस शाखा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

माजी आमदार अनिल गोटे, विद्यमान आमदार फारूक शाह यांनीही काही दिवसांपूर्वी शहरातील वाहतूक नियंत्रणप्रश्‍नी या पोलिस शाखेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह लावले होते. असे असताना फक्त दोनशे रुपयांच्या लाचेसाठी ट्रॅफिक हवालदार बुधवारी (ता. ३) गजाआड झाल्याने शहरातील वाहतुकीला शिस्त कशी लागेल, असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पैसे वसुलीचा त्रास

चाळीसगाव येथील तक्रारदाराचे दुचाकीने धुळे शहरात नेहमी येणे-जाणे असते. तो दिसला की त्याला बारापत्थर परिसरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या शहर वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेचा एक हवालदार अडवत असे. दुचाकीधारकाकडे वाहन परवान्याची मागणी करणे, परवाना असेल तर दुसरे एखादे कारण पुढे करून दुचाकीधारकाची गळचेपी करण्याचा प्रयत्न ट्रॅफिक हवालदार करत होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यात मग दुचाकीधारकाकडे दोनशे किंवा पाचशे रुपयांची लाच मागितली जात होती. लाच दिली नाही तर तो हवालदार दुचाकीधारकाची वाट अडवूनच ठेवायचा. तसेच मोठ्या रकमेचा ऑनलाइन दंड आकारण्याचा धाक दुचाकीधारकाला दाखवायचा. तहसील कार्यालय चौकात संबंधित दुचाकीधारकाला ट्रॅफिक हवालदारांचा नेहमीचा व पैसे वसुलीचा त्रास होता. या त्रासाला कंटाळून त्या दुचाकीस्वाराने मंगळवारी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचखोराला अटक

विभागाने तक्रारीची पडताळणी करत बुधवारी शहरातील बारापत्थर रोडवरील तहसील कार्यालय चौकालगत अँग्लो ऊर्दू हायस्कूलजवळ सापळा रचला. तेव्हा ट्रॅफिक हवालदार उमेश दिनकर सूर्यवंशी याने दुचाकीधारक तक्रारदाराला अडविले आणि त्याच्याकडे ऑनलाइन दंड नको असेल, तर दोनशे रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.

दुचाकीधारकाकडून दोनशे रुपयांची लाच घेत असतानाच ‘एसीबी’च्या पथकाने लाचखोर उमेश सूर्यवंशी याला पकडले. त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला. संशयित सूर्यवंशी याला जिल्हा न्यायालयात गुरुवारी (ता. ४) हजर केले जाणार आहे.

ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे येथील पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, तसेच राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण शेटे, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली. त्यांना नाशिक विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन लाभले.

‘तू-तू, मैं-मैं’चा खेळ बंद व्हावा

शहरात ट्रॅफिकचा विचका झाला आहे. या संदर्भात महापालिका आणि वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेत सतत पत्रव्यवहारातून एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करण्यात धन्यता मानली जाते. रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण हटविण्यासाठी, अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे पोलिस शाखा सुचविते.

दुसरीकडे या स्थितीचा गैरफायदा घेत बेशिस्त नागरिक रस्त्यावर कशाही पद्धतीने वाहन पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या स्थितीत पाचकंदिलापासून देवपूरमधील जीटीपी स्टॉपपर्यंत तर चालणे कठीण झाले आहे. शहरात चौफेर असे प्रकार दिसतात. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेने ‘तू-तू, मैं-मैं’चा खेळ बंद करावा आणि प्राप्त अधिकारान्वये बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा धुळेकर व्यक्त करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT