Tehsildar Pulkit Singh in subordinate mineral operations seized dumper was taken on basis of GPS nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : गौण खनिज कारवाईत जप्त केलेले डंपर गायब; तहसिलदार पुलकिंत सिंह यांनी पुन्हा घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाची वाहतुक करताना कारवाईत पकडलेले वाहन नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातूनच गायब झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान, त्या वाहनाचा काही तासातच जीपीएस ट्रॅकिंगच्या माध्यमातून शोध घेत नंदुरबारचे तहसिलदार पुलकित सिंह यांनी वाहन पुन्हा ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, तहसिलदाराच्या वाहनावरच चालकाने वाहन चढविण्याचा प्रयत्नही या वेळी झाला. याबाबत चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (Tehsildar Pulkit Singh in subordinate mineral operations seized dumper was taken on basis of GPS nandurbar news)

गेल्या २२ जूनला डंपर (डीडी ०१, एल ९३७३)मधून क्षमतेपेक्षा जास्तीचे गौण खनिजाची वाहतूक करण्यात येत असल्याने त्याच्या विरोधात कारवाई करून पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाला निर्देश देण्यात आले होते. वाहन चालकाचा जबाबही नोंदविण्यात आला होता.

तसेच, वाहन गौण खनिजासह जप्त करण्यात आले होते. मात्र, सदर वाहन आरटीओ कार्यालयातून गायब झाले होते. तथापि, गैरकृत्यांवर कठोर कारवाईचा एक भाग म्हणून आणि कायद्याचे राज्य सुनिश्‍चित करण्यासाठी नंदुरबार तहसीलमधील पथक महाखणीज ॲपच्या माध्यमातून वाहनाच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवून होते. शनिवारीदेखील ॲपच्या डेटावरून हे वाहन कार्यरत होते.

दरम्यान, काल (ता. ७) नंदुरबार जिल्ह्यातील गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या पथकांपैकी एका पथकाने वाघोदा गावाजवळ दुपारी १२.१४ ला एक वाहन थांबवले. मात्र, या वाहनाचा चालक वाहनासह पळून गेला. सुरक्षेच्या बाबी लक्षात घेऊन पथकाने पाठलाग न करता महाखनिज ॲपवर मागोवा घेण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी पुन्हा मागोवा घेण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तथापि या वाहनाने ६.४६ला पथराई येथे प्लॉट क्रमांक ५१३८ या ट्रिपसाठी ईटीपी तयार केला होता. पथराई हे गाव नंदुरबार तहसीलच्या हद्दीत आहे. वाहन ट्रॅकिंग सुरू करण्यात आले, तेव्हा सुरवातीला कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, काही वेळातच ते वाहन तळोद्याकडे जात असल्याचे दिसून आले.

त्यामुळे नादुरुस्त वाहन पकडण्यासाठी नंदुरबार व तळोदा येथील तहसिलदार, गौण खनिज अधिकारी आणि आरटीओ कार्यालयातर्फे संयुक्त कारवाई करण्यात आली. पथकाने तळोदा तहसीलदारांना याबाबत माहिती दिली आणि वाहन शोधण्यासाठी पथके सक्रिय केली. शिवाय, वाहनाच्या स्थानाचा मागोवा सुरू ठेवण्यासाठी गौण खनिज विभागाची मदत घेतली. अतिशय भरधाव वेगाने जात असलेल्या या वाहनास पाठलाग करून उभदजवळ पकडण्यात आले.

त्यावेळी चालकाने सिंह यांच्या शासकीय वाहनावर डंपर चढवण्याचा प्रयत्न केला. शिवाय गाडीला नंबर प्लेट नव्हती. त्यानंतर २२ जूनला या गुन्ह्याबाबत प्रलंबित कारवाई पूर्ण करण्यासाठी वाहन ताब्यात घेण्यात आले होते. ते पुन्हा ताब्यात घेण्यात येऊन कारवाई करण्याच्या सुचना तहसिलदारांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT