A mound of earth thrown on the road to prevent accidents. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिंदखेडा-विरदेल रस्त्यावरील अरुंद पूल बनला अपघाताचे केंद्र

शिंदखेडा-दोंडाईचा रस्त्यावर शिंदखेडा शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या नाल्यावरील पुलाची देखभाल आणि दुरुस्ती न झाल्याने ते अपघाती केंद्र बनले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील शिंदखेडा-दोंडाईचा रस्त्यावर शिंदखेडा शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या नाल्यावरील पुलाची देखभाल आणि दुरुस्ती न झाल्याने ते अपघाती केंद्र बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पुलाची रुंदी वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शिंदखेडा-दोंडाईचा रस्ता दोन वर्षांपासून तयार होऊन वापरा वापरासाठी खुला झाला आहे. (The narrow bridge on Shindkheda Virdel road became the epicenter of accident dhule news)

मात्र शिंदखेडा शहरापासून विरदेलकडे जाताना चार किलोमीटरवर असलेल्या नाल्याच्या वरती जो पूल आहे तो जुन्या रस्त्याच्या मापाचाच व अरुंद आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची रुंदी वाढविली तरीदेखील या पुलाची रुंदी मात्र जुन्या रस्त्याप्रमाणेच असल्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांना या ठिकाणी अपघात होताना दिसत आहेत.

गेल्या दोन वर्षांमध्ये या ठिकाणी जवळपास आठ ते दहा प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी शिंदखेडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदने देऊन झाली.

त्या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त गतिरोधक करून दिलेले आहेत. पुलाच्या बाजूला अपघात होऊ नये म्हणून मातीचा मोठा ढीग आणून टाकला आहे.

उलट या ढिगामुळेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यानंतर या पुलाची दुरुस्ती होईल, असे सांगितले जात होते. मात्र अद्याप या ठिकाणी असणारा पूल आणि मातीचा ढीग तसाच असल्यामुळे अजूनही अपघातांचे प्रमाण तसेच आहे. पुलाची दुरुस्ती झाली नाही तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल, अशा सूर प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

मातीचा ढिगारा नेण्याचा प्रयत्न

या अरुंद पुलावर अपघात होऊ नये यासाठी पुलाच्या बाजूला मातीचा ढीग टाकण्यात आला आहे. हा मातीचा ढीग अनेक दिवसांपासून पडला होता. त्यामुळे बुधवारी (ता. ७) अचानक एक ट्रॅक्टर त्या ठिकाणी आला आणि हा मातीचा ढीग भरू लागले.

त्या वेळी त्या ठिकाणाहून जाणारे सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी माती भरणाऱ्यांना अटकाव केला. त्यामुळे मातीचा ढीग त्या ठिकाणी कायम राहिला, अन्यथा हा मातीचा ढिगारा अज्ञात वाहनधारकांनी उचलून नेला असता व त्यानंतर सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मातीचा ढिगारा कोणी उचलून नेला याचा शोध सुरू केला असता यात नवल नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT