theft 
उत्तर महाराष्ट्र

घर बंद असल्याचा डाव साधला; आणि २४ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले 

भरत बागुल


पिंपळनेर : जेबापूर (ता. साक्री) येथे भर चौकातील अनिल भदाणे यांच्या घरी बुधवारी (ता.२४) पहाटे २४ तोळे सोन्याच्या दागिन्यांची धाडसी चोरी झाल्याचे उघडकीस आले. एलसीबी पथक, डॉग पथक, फिंगर प्रिंट पथक दाखल झाले. मात्र गावाच्या वेशीपर्यंतच डॉगने मार्ग दाखवला. पिंपळनेर पोलिसात याबाबत चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंपळनेरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेले जेबापूर येथील अनिल भदाणे हे नोकरीनिमित्त नाशिक येथे स्थायिक झाले त्यांची आई इंदुबाई भदाणे या जेबापूर येथेच राहत होत्या. त्यांची तब्येत बिघडल्याने त्या आठ दिवसांपूर्वी नाशिक येथे उपचारासाठी मुलाकडे गेल्या होत्या. घर बंद असल्याचा डाव चोरट्यांनी साधला. या घराजवळच राहणारे शिवाजी भदाणे यांना पहाटे घराच्या दाराचे कुलूप खाली पडलेले दिसले. त्यांनी आत प्रवेश केला असता ओसरी व मधल्या घरातील गोदरेज कपाट तोडलेले दिसले. त्यांनी फोनवरून अनिल भदाणे यांना चोरी झाल्याची माहिती दिली.

चोरट्यांनी घरातील कपाटे तोडून त्यातील २४ तोळे सोन्याचे दागिने त्यात नेकलेस, राणी हार, चैन, बांगड्या, अंगठी, पाटल्या, डबल गोपची सरी व इतर किरकोळ सोने असा एकूण २४ तोळे सोन्याचा ऐवज लंपास केल्याचे अनिल भदाणे यांनी सांगितले. धुळे येथून सायंकाळी चारला डॉग पथक, फिंगरप्रिंट पथक, एल सी बी पथक, उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे, पिंपळनेर साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT