Dhule News : दुचाकी चोरीसाठी नाशिकहून शिरपूरला येऊन राहिलेल्या चोरट्यासह त्याच्या स्थानिक साथीदाराला शहर पोलिसांच्या शोधपथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या एकूण सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त दुचाकींची एकूण किंमत दोन लाख ३० हजार रुपये आहे.
शहरातील खंडेराव मंदिर रस्त्यावरील उपाहारगृहचालक हेमंत भोई याची होंडा सीबी युनिकॉर्न दुचाकी २० फेब्रुवारीच्या सायंकाळी अज्ञात संशयितांनी चोरून नेली होती.
या गुन्ह्याच्या तपासात निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी दिलेल्या सूचनेवरून शहर पोलिसांच्या शोधपथकाने संशयित संतोष विठ्ठल हटकर (वय ३३, रा. क्रांतीनगर, शिरपूर) व रितेश सुरेशसिंह जमादार (३७, रा. सातपूर, नाशिक) यांना ताब्यात घेतले. (Thieves of Nashik Shirpur Arrested with six bikes Action of search team of Shirpur city police Dhule News)
त्यांनी हेमंत भोई यांची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. संशयितांनी जबाबादरम्यान सांगितलेल्या कार्यपद्धतीवरून ते सराईत चोर असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी पोलिसी खाक्या दाखविताच संशयित संतोष हटकर याने घराजवळ लावलेल्या चोरीच्या अन्य पाच दुचाकीही काढून दिल्या.
त्यात होंडा युनिकॉर्न, होंडा शाइन, हीरो होंडा स्प्लेंडर, हीरो डीलक्स आदी ब्रॅन्डच्या दुचाकींचा समावेश आहे. जप्त दुचाकीची एकूण किंमत दोन लाख ३० हजार रुपये आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यातील शिरपूर व शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यातही पोलिस यशस्वी ठरले. संशयित रितेश जमादार चोरीच्या उद्देशाने काही दिवसांपासून संतोषसोबत क्रांतीनगर येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अन्साराम आगरकर, उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, गणेश कुटे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, प्रवीण गोसावी, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंखे, मिथुन पवार, राम भिल यांनी ही कारवाई केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.