Rain Update News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Rain Update : जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसामुळे दाणादाण

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : जिल्ह्यात रविवारी (ता. ४) अकराच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली.

पाऊस कमी झाला असला तरी त्यापूर्वी काही मिनिटांसाठी आलेले वादळ तळोदा तालुक्यात एकाचा प्राण घेऊन शांत झाले, तर ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, अनेक ठिकाणी घराचे छत, घरावरील पत्र उडून गेले. त्यामुळे काही वेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. (Thunderstorm due to rain in nandurbar district damage crops electricity problem Nandurbar Rain update news)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार लगतच्या गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळ होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार गुजरात लगत असल्याने त्याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यातही जाणवले.

सकाळी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. वातावरणात गारवा होता. त्यातच सकाळी अकराच्या सुमारास अचानक जोरदार वारा सुरू झाला. त्यानंतर वादळ आले. त्यात नंदुरबार शहरासह तळोदा, अक्कलकुवा, शहादा, नवापूर व धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तळोदा तालुक्यातील तीन मित्र कारने लगतच्या गावाकडे जात असताना वादळामुळे कारवर झाड कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. तसेच या वादळामुळे समोरचे काहीही दिसेनासे चित्र होते. त्यामुळे अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर महामार्गावर वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

वादळामुळे अनेकांच्या घरावरील छप्पर, पत्रे उडून गेले. दुर्दैवाने कुणालाही मोठी इजा त्यात झाली नाही. मात्र काही पत्रे सापडले, तर काही गायब झाले. पत्र्यांचे वाकून नुकसान झाले. या वादळात अनेक जण रस्त्यावरच सापडले होते. जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्यांनी अर्धा तास प्रवास केला.

दरम्यान, वादळासोबतच पावसानेही हजेरी लावली. काही मिनिटे नंदुरबार शहर व परिसरात पाऊस झाला. बाजार समितीतील शेतकऱ्यांचा विक्रीसाठी आलेले धान्य वाचविण्यासाठी एकच तारांबळ उडाली. जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंदाणेसह परिसरात वीज कंपनीचे मोठे नुकसान

मंदाणे : परिसरात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. साधारणतः अर्ध्या तासापर्यंत झालेल्या तुफान वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळित होऊन शेतकऱ्यांसह नागरिक, व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंदाणेसह परिसरातील भागात अचानक आलेल्या तुफानी चक्रीवादळ व पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

त्यात काढणीला आलेला मका, बाजरी, ज्वारी, केळी या पिकांचे मोठे नुकसान होऊन चाऱ्याचे व शेतोपयोगी वस्तूंचेदेखील प्रचंड नुकसान झाले. वाऱ्यामुळे विजेचे खांब व तारा तुटल्याने वीज वितरण कंपनीचेदेखील मोठे नुकसान झाले.

शेतकरी व मजूर सकाळपासूनच शेतीकामामध्ये व्यस्त असतानाच अकराच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसायला लागल्या. त्यामुळे गावातील, शेतातील घरांवरील पत्रे उडून गेले. काही नागरिकांची घरकुलाची कामे सुरू असल्याने त्या लाभार्थ्यांचे पत्रे व भिंत पडली. ठिबक नळ्या, पाइपलाइन, चारा व शेती अवजारे उडून गेली.

अनेक झाडे व वीजखांब उन्मळून पडले. त्यामुळे वीजतारदेखील जमीनदोस्त झाली. झाड पडल्याने तारा तुटल्या. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाले. वीजपुरवठादेखील बंद झाला. बाजारातदेखील छोट्या व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती.

नुकसानभरपाईची मागणी

दर महिन्याला होणाऱ्या बेमोसमी पावसामुळे याआधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून युद्धपातळीवर दोन, तीन वेळा करण्यात आले; परंतु त्याबाबतची कोणतीही भरपाई आजपर्यंत मिळाली नाही व कधी मिळेल याची शाश्‍वतीही शेतकऱ्यांना राहिलेली नाही.

सरकार फक्त नुकसानभरपाई मिळणार असल्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तत्काळ भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

नवापूर तालुक्यात घरांची पडझड

नवापूर : तालुक्यात रविवारी सकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे उन्मळून, तरी काही वृक्षांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही घरांची कौले, पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार २२ गावांतील ४० घरे, एक बंद असलेला पोल्ट्रीफार्म यांचे नुकसान झाले. तलाठ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

शहरातील मंगलदास पार्कमधील डॉ. कटारिया हॉस्पिटलसमोरील डीपीवर व वीजवाहिन्यांवर वृक्षांच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा सकाळपासून बंद आहे.मळवान (ता. नवापूर) येथील शेतकरी यशवंत गुलाबसिंग गावित यांचा बैल मळवाण शिवारात शेतात विज पडून मृत झाला.

करंजी बुद्रुक परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली. घरांचे पत्रे उडाले आहेत. विजेचे खांब पडले आहेत. तहसीलदारांनी ताबडतोब नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करंजी बुद्रुकचे सरपंच तथा प्रदेश आदिवासी काँग्रेस नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर. सी. गावित यांनी केली आहे.

म्हसावदला गोठ्यावरील पत्रे उडाले

म्हसावद : म्हसावद परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दुपारच्या वेळेस अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात काळोख

होऊन वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. जोराच्या हवेमुळे गावात व परिसरातील बऱ्याच नागरिकांचे पत्रे उडाले, तर शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. येथील प्रकाश हरी चौधरी यांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले व दरवाजाही पडला. किशोर बेदमुथा ऊर्फ चंदूशेठ यांच्या नव्या घराचे पीओपी हवेमुळे खाली पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT