to prevent sale of bogus seeds during Kharif season Agriculture Department has formed 5 Bharari teams in district dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कृषी विभागातर्फे 5 भरारी पथके; बोगस विक्रीला बसेल चाप

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. (to prevent sale of bogus seeds during Kharif season Agriculture Department has formed 5 Bharari teams in district dhule news)

खरीप हंगामात बोगस बियाण्याची विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात पाच भरारी पथके तयार केली असून, या पथकांमार्फत बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली.

बियाणे, खते व कीटकनाशकांचा गुणवत्तायुक्त पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर तक्रार निवारण सुविधा केंद्र १५ एप्रिल ते ३० सप्टेंबरला या कालावधीसाठी स्थापन करण्यात आले. या तक्रार निवारण सुविधा केंद्रावर रोज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत ९५०३९३८२५३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवावी.

जिल्हा कृषी विभागाकडून खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुकास्तरावर चार व जिल्हास्तरावर एक अशा एकूण पाच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

खरीप हंगामात फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट नंबर शेतकन्यांनी पडताळून पहावे. तसेच पेरणी झाल्यावर बियाणे पाकिटे पीक निघेपर्यत जपून ठेवावे.

अनधिकृत बियाणे खरेदी करू नये. कीटकनाशके, तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. गाडीवरून खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खत खरेदी करू नये. कुठे असे फ्लाय सेलर्स आढळले तर तत्काळ संबंधित मोबाईलवर तक्रार नोंदवावी. खत खरेदी करताना रीतसर बिल घ्यावे.

कुणी खत विक्रेता जास्त दराने यूरियासारख्या अनुदानित खतांची विक्री करत असल्यास, तसेच झीरो बिल पावतीवर खत विक्री करत असेल तर त्याबाबत लेखी तक्रार जिल्हा कृषी कार्यालयास अथवा तालुका कृषी कार्यालयास करावी, असे आवाहन श्री. तडवी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT