beating esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : ट्रॅक्टर अडवून मारहाण; रोकडसह दागिन्यांची लूट

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील खलाणे रस्त्यालगत हॉटेल कुटियाजवळ गुरुवारी (ता. १९) रात्री नऊच्या सुमारास दिवाणसिंह करणसिंह गिरासे (वय २३, रा. दराणे, ता. शिंदखेडा) ट्रॅक्टरवर सिमेंट उतरून परत येत असताना चिमठाणे येथील पाच तरुणांनी अडवून मारहाण करून ट्रॅकटरचे नुकसान केले व रोकडसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा शनिवारी (ता. २१) रात्री शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल झाला.(tractor driver beaten by youth dhule crime news)

दिवाणसिंह गिरासे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की गुरुवारी रात्री नऊच्या सुमरास चिमठाणेजवळील कुटिया हॉटेलच्या २०० मीटर अंतरावर खलाणे रस्त्यावर कारण नसताना धनंजय ऊर्फ मोन्टी यशवंत धनगर, हिरालाल विश्वास माळी, परेश दिलीप माळी, महेंद्र साहेबराव पाटील व रितीकेश राजेंद्र धनगर (सर्व रा. चिमठाणे ) यांनी लोखंडी कुन्हाड उलटी करून उजव्या खांद्यावर, हाताला मारून तसेच लाठ्याकाठ्या, लोखंडी सळ्यांनी हातापायाला व साक्षीदार पूनमसिंह लोटनसिंह गिरासे (रा. चिमठाणे) याला पोटावर मारहाण करीत खिशातील सात हजारांची रोकड, एक ग्रॅम सोन्याची बाळी व गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंदाजे किंमत ६० हजार रुपये किमतीची साखळी जबरीने हिसकावुन घेतली.

दोन्ही ट्रॅक्टरची कुऱ्हाडीने तोडफोड केली, तसे टायर फोडून नुकसान केले. शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक दीपक पाटील मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT