A faulty traffic island is formed by the convergence of four roads along the Shewali branch of National Highway No. Six. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : साक्री परिसरातून उड्डाणपुलाच्या मागणीला जोर; वाहतूक बेट देतेय अपघातास निमंत्रण

धनंजय सोनवणे

Dhule News : दिवसागणिक वाढत जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता अनेक महामार्गांचे चौपदरीकरण करण्यात येत आहे.

या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचेदेखील चौपदरीकरण करण्यात येत असून, यात शेवाळी गावाला तसेच साक्री शहराला वळसा घालून बाह्यवळण रस्ता (बायपास रस्ता) तयार करण्यात आला आहे. (traffic island has created near Shewali fork and is inviting accident dhule news)

यातून शेवाळी फाट्यालगत एक वाहतूक बेट तयार झाले असून, हे बेट मात्र सदोष असल्याने अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाची गरज असून, कायमस्वरूपी उपाय म्हणून या ठिकाणी उड्डाणपूलच केला जावा, अशी मागणी जोर धरत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामांतर्गत साक्री ते धुळे यादरम्यान साक्री, शेवाळी, नेर, कुसुंबा या ठिकाणी बाह्यवळण रस्ते (बायपास रस्ते) करण्यात आले आहेत.

यात साक्री शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता साक्री शहराला बाह्यवळण रस्ता आवश्यकच होता. हा रस्ता शेवाळी फाट्यापासून थेट दहिवेल व पुढे गुजरातला जाणाऱ्या रस्त्याला जोडण्यात आला आहे. यासोबतच शेवाळी गावातून जाणारा रस्तादेखील बाहेरून काढण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गरज उड्डाणपुलाची अन् केले वाहतूक बेट

नव्याने तयार झालेल्या या रस्त्यांमुळे शेवाळी फाट्यालगत हॉटेल कृष्णाईसमोर एक सदोष वाहतूक बेट तयार झाले असून, या ठिकाणाहून जुन्या महामार्गाने निजामपूर, नंदुरबारकडे जाणारा एक रस्ता तसेच साक्री शहराकडे येणारा दुसरा रस्ता, तर दोन्हीही नवीन तयार करण्यात आलेले बाह्य वळण रस्ते असे चार रस्ते एकाच ठिकाणी एकत्र येतात. यातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते.

वर्दळ लक्षात घेता या ठिकाणी उड्डाणपुलाचीच गरज असताना केवळ वाहतूक बेट ही तात्पुरती सोय करण्यात आलेली दिसून येते. या वाहतूक बेटाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या दिसून येत नसल्याने हे सदोष वाहतूक बेट अपघातास कारणीभूत ठरते आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे दहिवेल रस्त्याकडून साक्री शहरात प्रवेश करायच्या जुन्या रस्त्यावर जाण्यासाठी तर कुठल्याही प्रकारची उपाययोजना अद्यापपर्यंत केलेली नाही. यामुळे ही दोन्ही ठिकाणे सध्या अपघाताचे ‘डेंजर झोन’ ठरत असून, यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

चौपदरीकरणात अनेक तांत्रिक त्रुटी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या या चौपदरीकरण कामात अनेक ठिकाणी तांत्रिक त्रुटी दिसून येत आहेत. यात राष्ट्रीय महामार्गालगत अनेक गावे असून, या गावांना जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे सर्व्हिस रोड केल्याचे दिसून येत नाही. तसेच राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे गतिरोधक टाकण्यात आले असून, अनेक वाहने या गतिरोधकांवर आदळून अपघात होत आहेत.

महामार्गावर नव्याने तयार करण्यात आलेले पूल व रस्ता यात रस्ता खचून अंतर तयार झाल्याने वाहने या ठिकाणीदेखील आदळतात. महामार्गावर सूचनाफलकदेखील पुरेसे लावलेले नसून गावांचे जे काही फलक लावले आहेत तेदेखील गोंधळात टाकणारे असल्याने या सर्व तांत्रिक त्रुटींकडे लक्ष देऊन त्या वेळीच सुधारण्याची गरज आहे.

"शेवाळी फाट्यालगत चार रस्ते एकत्र येत असतानादेखील सुरक्षिततेच्या उपाययोजना त्या ठिकाणी दिसून येत नाहीत. या ठिकाणी उड्डाणपुलाची गरज असून, उड्डाणपूलच केला जावा." -भूषण सोनवणे, साक्री

"या मार्गावर प्रचंड मोठी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल केला जावा, जेणेकरून भविष्यात पुन्हा ही समस्या उद्‌भवणार नाही." -अविनाश कुवर, साक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

SCROLL FOR NEXT