Dhule Marathon News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Mahamarathon : या स्पर्धा मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद राहणार...

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील पोलिस परेड ग्राउंडपासून रविवारी (ता. ५) सकाळी सहाला सुरवात होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेसाठी संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. (Traffic on relevant road will be temporarily closed for Maha Marathon from police parade ground dhule news)

स्पर्धेतील पायलटिंगची, सरकारी वाहने व आपत्कालीन विभागाची वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रविवारी पहाटे पाचपासून ते सकाळी नऊपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नागरिक, प्रवासी वाहनांनी उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकान्वये केले.

स्पर्धेत विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत. मॅरेथॉनचा मार्ग हा पोलिस ग्राउंड, बारापत्थर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व तेथून शहरातील जुना आग्रा रोड, दत्तमंदिर चौकातून गोंदूर गावापर्यंत असा आहे.

या वेळी मॅरेथॉन मार्गावर मोठी वाहने आल्यास स्पर्धेत अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने पुढीलप्रमाणे वाहतुकीचे मार्ग हे दुचाकी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग : फाशीपूल येथे पोलिस मुख्यालयाकडे येणारा रस्ता, स्टेशन रोड येथे महात्मा फुले पुतळ्याकडे येणारा रस्ता, बसस्थानक, टॅक्सी केबिन स्टँडसमोरील रस्ता, मामलेदार कचेरी येथे बारापत्थर/पाचकंदिलाकडे येणारा रस्ता, लोकमान्य हॉस्पिटल येथे चाळीसगाव रोडकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारा रस्ता,

अग्रसेन पुतळा येथे मालेगाव रोडकडून येणारा रस्ता, नगावबारी येथे दत्त मंदिराकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे. तसेच गिंदोडिया हायस्कूल चौकाकडून पारोळा रोड, कराचीवाला खुंटाकडे येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग,

जुनी महापालिका इमारतीकडून कराचीवाला खुंटाकडे वाहतुकीचा मार्ग, आग्रा रोडवरील दत्तमंदिर चौकाकडे येणारा वाहतुकीचा मार्ग, गांधी पुतळ्याकडून येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

तसेच पंचवटी कॉर्नरकडे शहरातून येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येणार आहे. वलवाडी टी पॉइंटकडून स्टेडियमकडे येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येणार आहे. गोंदूर गावापुढे अर्ध मॅरेथॉनचे टर्न पॉइंट येथून वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येणार आहे, असे श्री. बारकुंड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT