Traffic congestion in the light market in the city esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवापुरात वाहतूक कोंडीची ‘मरणयातना’; शहराच्या अधोगतीत भर

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतातर वाहतूक कोंडीतून अंत्ययात्रा काढण्यासाठी कसरत होते. जिवंतपणी वाहतूक कोंडीतून वाट काढणे जिवावर जाते मात्र मरणानंतरही स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी मरणयातना सहन काराव्या लागतात.

वाहतूक कोंडी समस्या किती जटिल होत आहे याचा प्रत्यय कपिल पाटील या युवकाच्या अंत्ययात्रेप्रसंगी आला. (Traffic problems increase in Navapur city nandurbar news)

यात पालिका प्रशासन व संयुक्तरीत्या नियोजनाची गरज आहे. नवापूर शहरातील महादेव गल्लीतील कपिल पाटील यांचे नुकतेच निधन झाले. शहरातील लाइट बाजार परिसरात अंत्ययात्रा आल्याने तेथे वाहतुकीची कोंडी होती. नातेवाइकांना वाहतुकीतून अंत्ययात्रा काढण्यासाठी कसरत करावी लागली.

बाजारपेठेत दुकानदारांनी दुकान सोडून ओट्यावर दुकाने थाटल्याने अतिक्रमण झाले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आम्हाला अतिक्रमण काढता येते नाही, अशी ओरड करत पालिका अधिकारी व कर्मचारी वेळकाढूपणा करत होते. मात्र आतातर गेल्या वर्षभरापासून पालिकेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारीच सर्व कारभार सांभाळत आहेत.

कोणाचाच दबाव नसल्यामुळे शहरात सुधारणांऐवजी दुर्गती होत आहे. वाहतूक कोंडी समस्या उलट वाढत आहे. बाजारपेठेत बाजाराचा दिवस व सध्या दिवाळी सण असल्याने गर्दी होणे स्वाभाविक आहे. मात्र वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी असून नसल्यासारखे वर्तन करतात. शनिवारी नवापूर शहरातील आठवडेबाजार असतो.

दिवाळीच्या दरम्यान व दररोज होणाऱ्या वाहतूक समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत संबंधित नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व मुख्याधिकाऱ्यांनी शहरात व बाजारपेठेत वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही यासाठी योग्य नियोजन करून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नवापूर शहरातील वाहतूक कोंडीला केवळ पोलिस प्रशासनाच जबाबदार नाही तर पालिकेनेदेखील योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांचेदेखील वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

या भागातील नागरिक हैराण

बेशिस्त पार्किंग, अवजड वाहनांमुळे मोठा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात पोलिस व पालिका प्रशासनाने सुरवातीला वाहतुकीसंदर्भात नियोजन केले होते. परंतु पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.

शहरातील लाइट बाजार, लिमडावाडी, नारायणपूर रोड, मच्छी मार्केट, पालिका परिसर, बस स्टँड परिसर, कॉलेज रोड, गांधी पुतळा, सराफ गल्ली, सरदार चौक आदी भागातील वाहतूक समस्याने नागरिक हैराण आहेत.

वाहतूक शाखेची कारवाई हवी

अरुंद रस्ते, त्यात पार्किंगची भर. रस्त्याच्या निम्म्या भागापर्यंत पार्किंग होत असेल तर या रस्त्यावरून वाहने जातील तरी कशी, अशी बिकट स्थिती शहरात निर्माण झाली आहे. पोलिस अधूनमधून कारवाई करतात. याबाबत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे.

नागरिकांच्या सूचना

पालिकेने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पार्किंग व्यवस्था, नो-पार्किंग झोन, लाइट बाजार शास्त्रीनगर भागात अवजड वाहनबंदी, बाजारातील लोटगाड्यांसाठी झोन तयार करणे, शहरात दिशादर्शकफलक लावावेत यातून काही प्रमाणात का होईना समस्या मिटेल.

शहरातील वाहतुकीसंदर्भात पोलिस व पालिका प्रशासन संयुक्तरीत्या नियोजन करून योग्य कारवाई करण्याची, अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT