Dhule News : येथील महात्मा फुले कॉलनीतील रहिवासी व पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील (एनडीए) राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी लेफ्टनंट कर्नल प्रथम ऊर्फ यश गोरख महाले यांचे बुधवारी (ता. १८) पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी पुणे येथील दक्षिण कमांड सैनिक हॉस्पिटल येथे उपचारांदरम्यान निधन झाले.
पिंपळनेर येथील निवासस्थानी गुरुवारी (ता. १९) पहाटे तीनला त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. सायगाव (ता. चाळीसगाव) येथे सकाळी नऊला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Trainee Lieutenant Colonel Pratham died during treatment at the National Training Centre Dhule news)
खडकवासला येथील ‘एनडीए’ प्रशिक्षण केंद्रात लेफ्टनंट कर्नल पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून पुढील महिन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून रुजू होणारे येथील प्रथम (यश) महाले (वय २२) यांना प्रशिक्षण केंद्रात बॉक्सिंग गेम्स व इतर उपक्रम करताना मुकामार लागल्याचे समजते. पुणे येथे रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.
पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक गोरख महाले व इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका शीतल महाले (शेवाळे) यांचे ते एकुलते पुत्र होत. यश यांनी वयाच्या २२ व्या वर्षी ‘एनडीए’मध्ये लेफ्टनंट कर्नल या पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यांची पुढील महिन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर थेट नियुक्ती होणार होती.
कमी वयातच यश यांनी या पदाला गवसणी घातली होती. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांना या पदाचे आकर्षण निर्माण झाले होते. कठोर परिश्रम व मेहनत तसेच अभ्यासातील सातत्य यामुळे त्यांनी या पदापर्यंत मजल मारली.
यश यांनी पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण पिंपळनेर येथे घेतले होते. त्यानंतर त्यांनी सैनिकी शाळेत प्रवेश घेण्यासाठी कोल्हापूर येथे कोचिंग क्लास पूर्ण केला.
सातारा येथील सैनिकी शाळेत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल या पदासाठी परीक्षा देऊन ते विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. लेफ्टनंट कर्नल या पदासाठी पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे चार वर्षांपासून ‘एनडीए’ प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केले होते. पुढील महिन्यात ‘लेफ्टनंट’ या पदवीचा दीक्षांत सोहळा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार होता. मात्र, नियतीने अचानकच घाला घातला.
गुरुवारी पहाटे यश यांचे पार्थिव पिंपळनेर येथील महात्मा फुलेनगरातील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. नंतर सायगाव येथे शासकीय इतमामात सकाळी नऊला अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.