Anand Patil and Agriculture Officer inspecting the damaged wheat crop esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नेर येथे अज्ञाताने केली गव्हावर तणनाशकाची फवारणी; गहू पिकाचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नेर (ता. धुळे) : येथील नूरनगर पल्याड भागातील एका गहू पेरणी झालेल्या शेतात अज्ञाताने तणनाशक रसायनाची फवारणी केल्यामुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी रसायनाची फवारणी केल्याचा अंदाज प्रगतिशील शेतकरी व जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांनी सांगितले.

शेतात पिकाची पाहणी करताना आनंद पाटील, सहकारी शेतकरी विलास बोरसे यांना संपूर्ण शेतातील पेरलेल्या गहू पिकाचा तुरा जळालेल्या अवस्थेत दिसून आला. औषधाची फवारणी किमान दोन दिवस आधी केलेली असल्याचे वर्तविण्यात येत आहे. (Unknown sprays wheat herbicide at Ner Heavy loss of wheat crop Dhule News)

श्री. पाटील यांनी मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिवदे, कृषी सहाय्यक चेतन शिंदे यांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. या वेळी मंडळ कृषी अधिकारी शिवदे, कृषी सहाय्यक शिंदे यांनी तत्काळ नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.

या वेळी श्री. अरविंद शिवदे यांनी गहू पिकावर तणनाशकाची फवारणी केल्याचा खुलासा दिला. तसेच गहू पिकाला सुधारित करण्यासाठी उपयोगी औषधांची माहिती देऊन तत्काळ फवारणी करावी, असे श्री. पाटील यांना सांगितले.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

नुकसान केलेल्या अज्ञाताविरोधात धुळे तालुका पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पिकांवर अज्ञातांकडून तणनाशकांची फवारणी केली जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सर्व शेतकरी यापुढे रात्रीच्या वेळी शेतात गस्त घालतील, असे श्री. पाटील यांनी सांगितले. या वेळी शेतकरी सुभाष माळी, सूरज जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT