Unseasonal rains on Thursday damaged the millet crop  esakal
उत्तर महाराष्ट्र

Unseasonal Rain : मंदाणेसह परिसरात बेमोसमी पाऊस; शेतकऱ्यांसह मंडप व्यावसायिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : मंदाणेसह परिसरात गुरुवारी (ता. ४) दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. साधारणतः अर्ध्या तासापर्यंत झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळित होऊन नागरिकांची व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. (unseasonal rain crop damage nandurbar news)

मंदाणेसह परिसरातील भागात जोरदार हवा व पाऊस असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात काढणीला आलेली बाजरी, ज्वारी, केळी या पिकांचे मोठे नुकसान होऊन चाऱ्याचेदेखील प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

काही दिवसांपासून शहादा तालुक्यातील पूर्व भागात रोजच सकाळपासूनच ढगाळ वातावरण होत आहे. गुरुवारीदेखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण तयार होताना दिसत होते. मात्र अचानक पाऊस येईल अशी चिन्हे नव्हती; परंतु अचानक प्रचंड उकाडा होऊन दुपारी अडीचला जोरदार पावसाच्या सरी बरसू लागल्या.

अधूनमधून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे डबके साचले. बाजारातदेखील छोट्या व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. जोरदार हवेमुळे वीजपुरवठा खंडित झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मंदाणे, असलोद, जयनगर, वडाळी मामाचे मोहिदा, सोनवद परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आला. त्यामुळे केळी, बाजरी, ज्वारी, पपई आदी पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरात पंधरा दिवसांत चार ते पाच वेळा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

मात्र योग्य पंचनामे झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शहरासह ग्रामीण भागात ज्यांच्याकडे लग्नसोहळे होते त्यांची चांगलीच फजिती झाली. लग्नमंडप पूर्णता ओले होऊन कापडी साहित्य जोरदार वाऱ्यामुळे फाटून गेले, तर काही चिखलात ओले झाल्याने मोठे नुकसान झाले.

मंदाणेत साधारणतः १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस झाल्याने लग्नमंडप ओला झाल्याने मोठे नुकसान झाले. ज्यांच्याकडे विवाह सोहळा होता त्यांची व नातेवाइकांची तारांबळ उडाली. एक-दोन दिवसांआड पावसाची हजेरी लागत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. उशिरापर्यंत पूर्ण पावसाचे वातावरण होते.

नुकसानभरपाईची मागणी

दर महिन्यात होणाऱ्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरवड्यातही बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात आले; परंतु त्याबाबतची भरपाई कधी मिळेल याची शाश्वती नाही.

सरकार फक्त नुकसानभरपाई मिळणार असल्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दोन, तीन दिवसांआड होणाऱ्या बेमोसमी पावसाचे पंचनामे होऊन तत्काळ भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT