unseasonal rain crop damage esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Unseasonal Rain : अवकाळी व गारपिटीने कर्ले येथे पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Dhule Unseasonal Rain : शिंदखेडा तालुक्यात कर्लेसह परिसरातील परसुळे, अक्कलकोस, सतारे, बळसाणे, इंदवे आदी भागात शनिवारी (ता. ८) गारपीट व अवकाळी पाऊस झाला. (unseasonal rain Damage to crops in Kerala due to bad weather and hail dhule news)

रब्बीची अनेक पीके काढणीला आली असताना अचानकपणे गारपीट आणि पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, याबाबत आमदार जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रब्बी हंगाम सुरू झाल्यापासुन यंदा अवकाळी पावसाने धुळे जिल्ह्यात थैमान घातले आहे. शनिवारी सायंकाळी कर्ले गावात अचानकपणे गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरवात झाली. जवळपास अर्ध्या तासात गावातील शेतकरी तात्यासाहेब पवार, भगवान पवार, देवकानगर भागातील ठेलारी बांधवांसह शेकडो शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांदा विक्रीसाठी काढला होता. अशातच निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. वादळी वाऱ्यामुळे आणि गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT