धुळे : ज्या नागरिकांचे आधारकार्ड नोंदणीस दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा नागरिकांनी आधारकार्डची कागदपत्रे अद्ययावत करून घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्यावतीने देशभर नागरिकांच्या आधार कार्ड नोंदणीची मोहीम राबविण्यात येऊन बहुतांश नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत.
भारतीय विशिष्ट ओळख (पहचान) प्राधिकरण, नवी दिल्ली यांचेकडील ९ नोव्हेंबर २०२२ मधील अधिसूचनेत नमूद केलेल्या १६ क कागदपत्रांच्या अद्ययावत नियमावलीनुसार दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधार कार्डधारकांनी त्यांचे आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे अद्ययावत करणे आवश्यक आहे. (Update Aadhaar documents that have completed 10 years Dhule News)
तसेच, ज्या नागरिकांनी आधारकार्ड काढताना आपल्या ओळखीचा पुरावा व रहिवासी पुरावा संबंधी कागदपत्र ऑनलाइन सादर केले नाहीत. अशा नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करण्यासाठी आधार कार्डशी संबंधित कागदपत्र जवळच्या आधार केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन अद्ययावत करून घ्यावे.
कागदपत्रे ऑनलाइन अद्ययावत करण्यासाठी ५० रुपये इतके शुल्क निर्धारित केले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे. या कामासाठी स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आधार नोंदणीस दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या आधार कार्डधारकांना त्यांचे कागदपत्र ऑनलाइन अद्ययावत करून घेण्यासाठी जागृत करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.