Teachers Reruitment : सहा महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक पदभरतीला अखेर सुरवात झाली आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून (ता. १) सुरवात झाली.
येत्या १५ सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. (Upto 15 term for self certificate Instructions to Candidates under Teacher Recruitment Process dhule)
पात्रताधारक उमेदवारांचे शिक्षक होण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान ऑनलाइन माध्यमातून झाली.
उमेदवारांना आवश्यक सूचना https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावरील पोर्टलवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेनंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल.
गुणवत्तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील आणि नंतर निवड यादी तयार करून नियुक्ती देण्यात येईल. एकूण किती जागांवर पदभरती होईल याबाबत शिक्षण विभागाकडून स्पष्टता दिलेली नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दरम्यान, २०१८ आणि २०१९ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्यामुळे परीक्षा परिषदेने प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना औरंगाबाद खंडपीठाने टेट २०२२ परीक्षा देता येत नसल्याचा निर्णय दिला आहे.
त्यामुळे या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच टेट २०२२ परीक्षा एक वेळ देण्याची तरतूद आहे.
मात्र, काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळा टेट परीक्षा दिली आहे. अशा उमेदवारांनाही सहभागी होता येणार नाही. तसे दिसून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.