Dhule News : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील वारकरी, शेतकरी मंडळ गल्ली ते दिल्ली ते उत्तराखंडपर्यंत शांती संदेश अभियान घेऊन रविवारी (ता. ११) दिल्लीकडे रवाना झाले. त्यांचे पिंपळनेर ग्रामपंचायतीतर्फे स्वागत करण्यात आले.
या गल्ली ते दिल्ली शांती संदेश अभियानात झाडे, पाणी, लेक देश, संस्कृती, धर्म, गोमाता वाचवा, तर भ्रष्टाचार, दहशतवाद, भ्रूणहत्या, वृद्धाश्रम, व्यसन हटवा आणि स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्रदूषणमुक्त भारत, दिवसेंदिवस तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. (Varkari left for Delhi with message of peace Delhi to Uttarakhand travel Welcome by Pimpalner Gram Panchayat Dhule News)
त्यापासून सावध राहावे, मोबाईलचा वाढत जाणारा अतिवापर कमी करावा, असे विविध प्रकारचे संदेश घेऊन वारकरी मंडळ गल्लीपासून ते दिल्ली, उत्तराखंडपर्यंत जात असताना वाटेत लागणाऱ्या छोट्या-मोठ्या गावांमध्ये टाळ-मृदंग वाजवीत हे संदेश समाजापर्यंत पोचविणार आहेत.
वारकरी शांती संदेश अभियान घेऊन जात असताना त्यांचे खामखेडा चौफुलीजवळ ग्रामस्थांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
त्यानंतर पिंपळनेर नगरीत ग्रामपंचायतीतर्फे सरपंच देवीदास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश बधान, प्रमोद गांगुर्डे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप, विशाल गांगुर्डे, शैलेश ठाकूर व कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन वारकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
या शांती संदेश अभियानाची सुरवात खामखेडा येथूनच करण्यात आली. वारकऱ्यांनी टाळ-मृदंग वाजवीत गावातून प्रभातफेरी काढली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या संदेश अभियानात वारकरी व शेतकरी मंडळ हभप अरुण चिंचोले यांच्या नेतृत्वाखाली महेश शिरोरे, आण्णा पाटील, वसाकाचे माजी संचालक संजय मोरे, माजी सरपंच दादाजी बोरसे, जयराम शेवाळे, बळिराम शेवाळे, एकनाथ शेवाळे, नानाजी शेवाळे, चेतन पाटील, मीनाक्षी शेवाळे, सुशीला शेवाळे, रूपाली शिरोरे, सुरेखा शेवाळे, प्रमिला शेवाळे, अलका बोरसे, अंजना मोरे, अनिता धामणे, नारायण पाखले, नाना दशपुते, प्रभाकर मालपुरे, प्रकाश मालपुरे, राजेंद्र पुरकर, देवाजी शेवाळे, ईश्वर बधान, हेमलता बधान, दीपक मोरे, राधेश्याम आदी वारकऱ्यांचा समावेश आहे. ते दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शांती संदेशकार्याची महिती सोपविणार आहेत.
नंतर शांती संदेश अभियान दिल्ली, उत्तराखंडपर्यंत पोचविल्यावर आपल्या जिवाची बाजी लावून आपल्या देशाचे आणि आपले दिवस-रात्र रक्षण करतात अशा आपल्या सैनिकांचा वाघा बॉर्डर येथे विशेष सन्मान करून उत्तराखंड येथील केदारनाथ येथे मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय व रुद्रप्रयाग जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षिक विशाखा भदाणे यांच्या हस्ते जनजागृती अभियानाचा समारोप करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.