The ongoing cleaning of the chariot on Monday for the Rath Yatra that will depart on Wednesday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Festival News : व्यंकटेश बालाजीची रथयात्रा; हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Festival News : येथील १६९ वर्षांची परंपरा असलेल्या भगवान व्यंकटेश बालाजींची रथयात्रा येत्या बुधवारी (ता. २५) निघणार असून, तयारीला वेग आला आहे. रथाला रंगरंगोटी करण्यात येत आहे. रथयात्रेनिमित्त बाजारपेठेतील दुकाने विक्रीच्या सामानांनी सजले आहेत.

येथील रथयात्रा हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असून, दोन्ही धर्म एकत्रित रथयात्रा साजरा करीत असल्याने येथे राष्ट्रीय एकात्मता दिसून येते. (Venkatesh Balaji Rath Yatra symbolizes Hindu Muslim unity dhule festival news)

परिसरातील ३५ गावांतील भाविक दर्शनासाठी येतात. रथयात्रेचे सर्व नियोजन ग्रामपंचायत करीत आहे. येथील बालाजीचे प्राचीन मंदिर व प्राचीन शैलीचा भव्य व उंच रथ आहे. बुधवारी दुपारी साडेबारला रथयात्रा निघेल. येथील आनंदवन संस्थानचे मठाधिपती डॉ. मुकुंदराज महाराज यांच्या हस्ते पूजा व परंपरेनुसार प्रभारी सरपंच सविता पाटील यांच्या हस्ते महाआरती होईल.

त्यानंतर ‘राधे रमणा गोविंदा’च्या जयघोषात रथयात्रेला सुरवात होईल. दरम्यान, रथाला पाण्यनेते धुऊन तेल लावण्यात येत असून, रंगरंगोटी करण्यात येत आहे. रोषणाई, झेंडूच्या माळा, झेंडे, घोडे, अर्जुन, भालदार, चोपदार या मूर्तींनी रथाची सजावट होईल. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

रथमार्गाची मुरुम व दगड टाकून आवश्यक ठिकाणी दुरुस्ती ग्रामपंचायत करीत आहे. विठ्ठल मंदिराजवळील रथघरापासून रथयात्रेस सुरवात होऊन बालाजी मार्गाने शिवशक्ती चौक, संत रोहिदास चौक, डॉ. आंबेडकर चौक, बजरंग चौक, युनियन बँक, गांधी चौक, ग्रामपंचायत व स्वस्थानी असा रथयात्रेचा परंपरागत मार्ग आहे.

रथाला वळविण्यासाठी चाकाला मोगऱ्या लावतात. पूर्वी शिंदखेडा येथून मोगरी देणारे तरबेज लोकांना बोलावले जायचे. परंतु काही वर्षांपासून गावातील तरुण मोगरी देण्यात तरबेज आहेत. श्री बालाजींना घरोघरी आरतीने ओवाळून केळीचा प्रसाद दिला जातो.

माजी सरपंच शिवनाथ कासार, पराग देशमुख, गौरव कासार, जी. के. ताबंट, किशोर पावनकर, गणेश कासार, प्रकाश माळी, सौरभ वाणी, काशीनाथ माळी, अमृत सैंदाणे, पीयूष शिंपी, सिद्धार्थ शेटे, यश कासार, कृणाल वाणी, संदीप गुजर, जितेंद्र बागूल, गोपाल कासार, धीरज कासार, सुमित पावनकर, जयेश पाटील, दर्शन पवार, निरंजन भदाणे, कुंदन महाजन, मनोज कासार, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी श्याम माळी, राजेंद्र जाधव, अर्जुन मराठे, रवींद्र बडगुजर आदी रथाची साफसफाई करीत आहेत. सोनगीर व परिसरातील भाविकांनी रथावरील श्रीबालाजींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT