19 percent of the project is understocked esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : टंचाईच्या काळात सोनवद प्रकल्पावरच भिस्त; दोन्ही धरणांत अत्यल्प साठा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथे चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नियमित पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिकांची पाणीपातळी आतापासूनच खोलवर गेली आहे. देवभाने धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

तिथेही २० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. ( very little storage in dams on Sonvad project dhule news)

येथील पाणीपुरवठ्याची मदार सोनवद प्रकल्पावरच राहणार असल्याची माहिती उपसरपंच प्रवीण पाटील यांनी दिली. धुळे तालुक्यातील सर्वाधिक मोठे गाव कापडणे आहे. लोकसंख्या २५ हजारांवर आहे.

चारही दिशांना विस्तीर्ण पसरलेल्या या गावाची पाणीपुरवठ्याची स्थिती नाजूक होत चालली आहे. या वर्षी पावसाळा अत्यल्प झाला. चार पावसांत पावसाळा संपला. नदीच काय नाल्यांतूनही पाणी वाहिले नाही. पूर तर लांबच. येथे पाणीपुरवठा करणाऱ्या चार कूपनलिकांची अवस्था नाजूक होत चालली आहे. पाणीपातळी कमी झाली आहे.

देवभाने धरणात २० टक्के साठा

पाणीपुरवठ्यासाठी देवभाने धरणाची मदत घेणे सुरू झाले आहे. परिणामी चार पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. हा साठाही दीड महिन्यात संपुष्टात येईल. येथे अवैध पद्धतीने साठा संपुष्टात आणण्याचे स्रोतही अधिक आहेत.

या धरणावर कापडणेसह देवभाने व धमाणेची मदार आहे. धरणातील पाण्याची आतापासूनच बचत करणे आवश्यक असल्याची अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होतेय.

सोनवदमध्ये १९ टक्के साठा

येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी दहा वर्षांपूर्वी सोनवद प्रकल्प पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली होती. या योजनेचे मोठे राजकारण झाले. अद्यापही या योजनेतील बिले अडकली आहेत. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

धरणात धुळे शहरातील दूषित पाणी संचयित होत होते. चाचणी नमुन्यांमध्ये वारंवार अति दूषित पाणी आढळले अन् सुमारे तीन कोटींची पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. उद्‍भव विहीर व जलशुद्धीकरण केंद्र शोपीस म्हणून उभे आहेत.

दरम्यान, दुष्काळी स्थिती अन् देवभाने धरणातील संपुष्टात येत असलेला पाणीसाठा. आता येथील तहान भागविण्यासाठी सोनवद पाणीपुरवठा योजनेलाच नवसंजीवनी द्यावी लागणार आहे.

सोनवदवरच राहील पाण्याची मदार

''या वर्षीच्या तीव्र दुष्काळामुळे देवभाने धरण लवकरच आटेल. सोनवदमधून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बंद पडलेल्या यंत्रसामग्रीला आतापासूनच सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.''-प्रवीण पाटील, उपसरपंच, कापडणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT