MSEB esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : ग्रामस्थांनो, ट्रान्स्फॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा..! वीज वितरण कंपनीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. (Villager inform to Mahavitaran if transformer burn nandurbar news)

पण ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची खबर १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

गावातील ट्रान्स्फॉर्मर जळाला तर वीजपुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी ट्रान्स्फॉर्मर ऑइल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्स्फॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत.

ट्रान्स्फॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो. या मोहिमेला यश आले असून, महावितरणला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्स्फॉर्मर जळाला आहे, हेच उशिराने समजले तर प्रत्यक्षात वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणला मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

टोल फ्री क्रमांक

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्स्फॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच वीजग्राहकांना जळगावचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) ७०३०४४००८४, धुळेसाठी कार्यकारी अभियंता (प्रशासन) ७८७५७६६७६९, तर नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांना ७८७५७६६६२७ या क्रमांकावर खबर देता येईल.

त्यासोबत त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरचा फोटो आणि ठिकाणाचा तपशील कळविता येईल. जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसवून लवकरात लवकर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याच्या महावितरणच्या मोहिमेस वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT