water scarcity face sakri city dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Scarcity : साक्रीकरांवर पाणी कपातीचे संकट गडद ? आवर्तनाचेही पाणी पडणार कमी

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सध्या उपलब्ध पाणीसाठा अतिशय थोडा शिल्लक राहिल्याने तो फारतर जानेवारीपर्यंतच पुरणार आहे.

धनंजय सोनवणे

Dhule Water Scarcity : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सध्या उपलब्ध पाणीसाठा अतिशय थोडा शिल्लक राहिल्याने तो फारतर जानेवारीपर्यंतच पुरणार आहे. त्यानंतर साक्रीकरांची तहान भागविण्यासाठी मालनगाव धरणातील आरक्षित पाणी आवर्तनातून आणले जाईल.

मात्र तेही पाणी कमी पडणार असल्याने साक्रीकरांवर आणखीन पाणी कपातीचे संकट घोंघावत आहे. यामुळे आगामी काळात साक्रीकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.(water scarcity face sakri city dhule news)

साक्री शहरात यंदा पाणीटंचाईच्या झळा तीव्र जाणवायला लागल्या असून आत्तापासूनच तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुढे हा कालावधी वाढून तीव्र टंचाईचा सामना करावा लागू शकतो. सध्या साक्री शहराला कावठे आणि दातर्ती येथील मुख्य दोन पाणीपुरवठा योजनांमधून पाणी पुरवले जाते आहे.

या पाणीपुरवठा योजना शिवाय नगरपंचायतीने तीन ठिकाणी विहीर अधिग्रहण केले आहे. नगरपंचायतीचे बारा बोअरवेल तसेच १७ हातपंपांमधून पाणी उपलब्ध करत तीन दिवसांनी पाणी पुरवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या पाण्याची देखील कमतरता जाणवणार असल्याने काही दिवसातच साक्रीकरांवर आणखीन पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

उपाययोजना राबविण्याची गरज

एकीकडे उपलब्ध साठ्यामध्ये अत्यल्प पाणी शिल्लक राहत असताना ते आणखीन कमी होण्याची वाट न पाहता त्याच ठिकाणी उपलब्ध पाण्याचे स्रोत बळकट करण्याची गरज आतापासून निर्माण झाली आहे.

यात या विहिरींच्या खोलीकरणासोबतच, त्याठिकाणी बोअरवेल करत आतापासूनच मुबलक पाणी उपलब्ध केले तर साक्रीकरांना उन्हाळ्यात देखील गरजे इतके पाणी मिळण्यास मदत होऊ शकते. या दृष्टीने प्रशासनाने आत्तापासून उपाययोजना करण्याची गरज निर्माण होते आहे.

सध्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या मदतीने शहरवासीयांना किमान तिसऱ्या दिवशी पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न होतो आहे. आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन मालनगाव धरणातील आरक्षित पाणी आवर्तनातून आणून ते पुरवले जाईल. याशिवाय टंचाई निवारण कृती आराखडा तयार करत यात टँकरद्वारे पाणी पुरवण्यासाठी निधीची मागणी केली आहे.

''तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरवण्याचा प्रयत्न होईल. या अनुषंगाने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. आगामी काळात टंचाईची तीव्रता भासणार असल्याने त्यादृष्टीने काटेकोर नियोजन सुर आहे. नागरिकांनी देखील पाणी जपून वापरावे.''- दीपक पाटील, मुख्याधिकारी, नगरपंचायत साक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT