Water scarcity esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Shortage : ऑगस्टपर्यंत 270 गावांना पाणीटंचाई; ‘अल निनो’मुळे दुष्काळाची भीती

एल. बी. चौधरी

Dhule News : दक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल निनो’ या समुद्री प्रवाहाच्या सक्रियतेमुळे मॉन्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. (Water shortage in 270 villages till August dhule news)

त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अनेक भागाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. त्यातच धुळे जिल्ह्यातील धरणे, तलावांमध्ये सरासरी मे उजाडला नाही तोवर अवघा ३७ टक्के जलसाठा आहे. दरम्यान, ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात संभाव्य २३६ गावे व ३५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात गत वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये सर्व धरणे, तलाव ओव्हर फ्लो झालेले होते. तरीदेखील पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मॉन्सून वेळेवर दाखल झाल्यास ही परिस्थिती बदलेल, परंतु हवामान विभागाने दिलेला ‘अल निनो’चा अंदाज खरा ठरल्यास जिल्ह्यात दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त होत आहे, त्यामुळे प्रशासनाने वेळीच नियोजन करण्याची गरज जाणकार व्यक्त करत आहे. जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता २७० योजना प्रस्तावित असून त्यासाठी एक कोटी २७ लाख ५८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पाणीटंचाईला सामोरे जाणार गाव, वाडे

साक्री : १८२

शिरपूर : ४४

धुळे : ३१

शिंदखेडा : १३

एकूण : २७०

गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

साक्री तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १८२ गावांना संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. धुळे तालुक्यातील १४२ गावातील १२४ ग्रामपंचायतींपैकी ३० गावे व एक वाडीला पाणी टंचाई जाणवू शकते. शिरपूर तालुक्यात १२ गावे ३४ वाड्यांना पाणीटंचाईची शक्यता असून १६ लाख २० हजार रुपये खर्चून ४५ विहीरी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत.

शिंदखेडा तालुक्यात १२ गावे व १ पाडा संभाव्य पाणीटंचाईच्या यादीत समाविष्ट असून ११ गावांना विहीरी अधिग्रहीत करून व एक गावास टॅंकरने पाणीपुरवठा केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी नऊ लाख ९६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. संभाव्य पाणी टंचाई गावांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रकल्पात चिंताजनक साठा

धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. सर्व लघु प्रकल्पात सध्या २५ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पात ४१ टक्के जलसाठा आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पात अवघा ३७ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईची दाट शक्यता असून काही गावांना टंचाई जाणवायला सुरवात झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना विभागाने बनविलेल्या ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंतचा पाणीटंचाईचा आराखड्यात संभाव्य पाणीटंचाईची गावे नमूद करण्यात आली आहेत.

उपाययोजना नेमक्या काय ?

जिल्ह्यात एकही मोठी पाणीयोजना प्रस्तावित नाही. धुळे तालुक्यात ३१ गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे, त्यासाठी १२ विहीरी अधिग्रहीत केल्या जाणार असून १९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी अनुक्रमे चार लाख ३२ हजार रुपये, व ३४ लाख २० हजार असे एकूण ३८ लाख ५२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

साक्री तालुक्यात १८२ गावांना पाणीटंचाई जाणवणार असून त्यासाठी ५९ लाख ४० हजार रुपये अपेक्षित आहे, या खर्चातून १६५ गावांना १६५ खासगी विहीरी अधिग्रहीत करणे, १७ गावांना आठ लाख ५० हजार रुपये खर्चातून टँकरने पाणीपुरवठा करणे असा एकूण ६७ लाख ९० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT