The ongoing work of Prakasha-Burai Upsa Irrigation Scheme in Tapi River Basin in Gavashivar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मंजुरी कधी?

शिंदखेडा-साक्री-नंदुरबार मतदारसंघाला होणार फायदा!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तापी नदीवर झालेल्या बॅरेजेसमुळे खूप मोठा पाण्याचा साठा पावसाळ्यात समुद्रात वाहून जातो.

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वाया न जाता ते पाणी प्रकल्पामध्ये टाकून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचेल यासाठी प्रकाशा-बुराई उपसासिंचन योजना आखण्यात आली आहे.

योजना मंजूर झाली तेव्हा ११० कोटी रुपये तर चक्क तीनपट म्हणजे ५५० कोटी रुपये खर्च होणार आहे. (When revised administrative approval for the Prakasha burai Upsa Irrigation Scheme Dhule News)

शिंदखेडा, साक्री व नंदुरबार तालुक्यातील सुमारे सात हजार ८५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना १९९९ मध्ये सुमारे ११० कोटी रुपयांची योजना तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात मंजूर करण्यात आली होती;

परंतु त्यानंतर आलेल्या आघाडी शासनामुळे ही योजना बारगळली, त्यानंतर २०१४ मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन कॅबिनेट व नंदुरबार जिल्ह्यांचे पालकमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या सततच्या पाठपुराव्याने या योजनेला मोठी गती मिळाली होती;

परंतु त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि पुन्हा ही योजनेचे काम ‘कासवगती’ने सुरू झाले होते. आता या योजनेसाठी सुमारे ५५० कोटी रुपयांची गरज आहे.

शिंदखेडा, साक्री व नंदुरबार तालुक्याची महत्त्वाकांशी योजना शिंदखेडा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी म्हणल्या जाणाऱ्या मतदारसंघासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाकांशी आहे.

शिंदखेडा, साक्री व नंदुरबार तालुक्यातील एकूण सात हजार ८५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, यामुळे तालुक्यातील दुष्काळी भाग असलेल्या या दोन्ही तालुक्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना प्रत्यक्षात साकार झाल्यानंतर पिण्याच्या व शेतीचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तीन लोकप्रतिनिधींमुळे मतदारसंघाला फायदा

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेचा फायदा नंदुरबार जिल्ह्याचे भाजपचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार रावल व साक्री विधानसभा मंतदारसंघाच्या शिवसेने (शिंदे गट)च्या आमदार मंजुळा गावित यांच्या मतदारसंघातील पिण्याच्या व शेतीच्या सिंचनासाठी फायदा होणार आहे.

सोमवारी (ता. १०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन आदी मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यने ‘दुग्धशर्करायोग’ असल्याने तिन्ही लोकप्रतिनिधींनी अग्रह करून या योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मंजुरी करून घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अशी आहे योजना

प्रकाशा बॅरेजेसच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात पुराचे पाणी वाहून जाते, हे वाहून जाणरे पाणी हाटमोहिदा (ता. नंदुरबार) गावशिवारातील तापी नदीवर इनटेक चॅनेल व जॅकवेल बांधून उपसाद्वारे पाणी उचलून पाइपाद्वारे पहिल्या टप्प्यात निंभेल (ता. नंदुरबार) येथील साठवण बंधाऱ्यात सोडणे, दुसऱ्या टप्प्यात असाणे (ता. नंदुरबार) येथील साठवण बंधाऱ्यात सोडण्यात येणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात शनिमांडळ (ता. नंदुरबार) येथील साठवण बंधाऱ्यात सोडण्यात येणार आहे. पुढे मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती मध्यम प्रकल्पात टाकण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यात बुराई (ता. साक्री) मध्यम प्रकल्पात टाकण्यात येऊन ते वाडी-शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्य प्रकल्पातून थेट ते सुलवाडेजवळ पुन्हा तापी नदीला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT