World Environment Day esakal
उत्तर महाराष्ट्र

World Environment Day 2024 : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वच माध्यमांनी पुढे यावे

World Environment Day : यंदा तर दुष्काळामुळे तीन महिन्यांपासून तापमानाची चाळिशी आजही ‘जैसे थे’ आहे.

दगाजी देवरे

World Environment Day 2024 : प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, वातावरणातील बदल, जागतिकीकरण, रसायनाचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याचे चित्र आहे. वाढते तापमान व त्याचे दुष्परिणाविषयी सतत चर्चाही केली जाते. यंदा तर दुष्काळामुळे तीन महिन्यांपासून तापमानाची चाळिशी आजही ‘जैसे थे’ आहे. मोसमी पाऊस उंभरठ्यावर असताना उष्णतेची काहिली मानवासह पशुपक्ष्यांनाही नकोशी झाली आहे. ( media should come forward to maintain balance of environment )

यंदा प्रथमच शासकीय यंत्रणा व सोशल मीडियावर वृक्षारोपणाची किती आवश्यकता आहे याची जोरदार चर्चाही होत आहे. उपाययोजनाही सुचविल्या जातात. पण अंमलबजावणीबाबत मात्र तितकीशी सजगता नसल्याने या चर्चा फोल ठरतात. पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक वृक्षलागवड करणे काळाची गरज आहे. शासनासह विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक, संस्था, संघटनांकडून त्यासाठी प्रयत्न होत आहेत.

साक्री तालुक्यात म्हसदी ते शेंदवड मांजरीपर्यंत हजारो हेक्टर सुरक्षित वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात वन विभागातर्फे सातत्याने वृक्षलागवडीवर भर दिला जात असल्याने जंगलांना गतवैभव प्राप्त होत आहे. वन विभाग दर वर्षी वनक्षेत्रात नवीन रोपवन तयार करते. यंदा पिंपळनेर (ता. साक्री) वन विभागात सुमारे ८० हजार विविध प्रकारची रोपे लागवड केली जाणार आहेत. दर वर्षी लागवड झालेली रोपे किती जगतात याचा विचारदेखील करणे आवश्यक आहे. कुऱ्हाडबंदीसह चराईबंदी ही तितकीच महत्त्वाची आहे. (latest marathi news)

कारण लावलेल्या रोपांची किमान वर्षभर तरी निगा राखणे आवश्यक असते. वाढते तापमान व त्याचे विविध घटकांवर होणारे दुष्परिणाम सारेच जण जाणतात. यंदा तापमानाने कहर करत मानवी जीवनासह पशु-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. पर्यावरणाचे रक्षण हे आपल्या जीवनाचे संरक्षण असल्याचे मानले जाते. मानवी जीवनात पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू ही पाच तत्त्वे मानली जातात. हिंदू धर्म, संस्कृतीत, पर्वत, नद्या, जंगले, तलाव, वृक्षवल्ली, प्राणी आदींना नेहमीच दैवी कथा व पुराणात पर्यावरणरक्षणाच्या उद्देशाने जोडले गेले आहे.

सोशल मीडियावर जनजागृती...

यंदाच्या वाढत्या उष्णतेचा, तापमानाचा खरंच धडा घेतला का खरा प्रश्न आहे. सोशल मीडियावर सातत्याने दोन महिन्यांपासून यंदाच्या तीव्र तापमानाची दखल घेतली गेली. यंदा मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. हे प्रबोधन उपयोगी येईल का हा खरा प्रश्न आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर झाला आहे हे वास्तव स्वीकारून वृक्षारोपणासाठी सहभाग वाढावा अशी अपेक्षा यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे.

''नैसर्गिक संपत्तीचे जतन झाल्यास पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल. वृक्षलागवडीसह डोंगरावर तृण (गवत) वाढविण्यासाठी वन विभागातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. वनक्षेत्रातील वाहून जाणारे पाणी अडविले तर पाणी जमिनीत मुरल्यावर जलस्तर कायमस्वरूपी टिकून असतो.''-डी. आर. अडकिने, वनक्षेत्रपाल, पिंपळनेर वन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT