Leopard Attack esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वर्ष सरले पण बिबट्या गवसेना

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : वर्षाअखेरीसही वन्यपशूंची पाळीव प्राण्यांवरच्या हल्ल्याची शृंखला काही थांबत नसल्याचे चित्र आहे. परिसरात एक दिवसाआड बिबट्या हमखास पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. बिबट्याने शुक्रवारी (ता.३०) रात्री येथील चिंचखेडे रस्त्यालगतच्या बोरमळा शिवारात म्हशीच्या पारडूवर हल्ला चढवत फस्त केले. तथापि दिवसा दर्शन देणाऱ्या बिबट्यामुळे शेती कामांना खीळ बसली आहे.

येथील बोरमळा शिवारात भरत श्रीराम देवरे यांच्या शेतातील पारडूवर बिबट्याने हल्ला चढवत फस्त केले. वन विभागास माहिती दिल्यावर वनकर्मचारी वसंत खैरनार, नितीन भदाणे आदींनी पंचनामा केला. गेल्या काही दिवसांपासून काकोर, डोंगऱ्यादेव, बोरमळा शिवारातच बिबट्याचा मुक्काम असल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Year Ended But Leopard Attack Not Stop Leopard Not Found Dhule News)

भरपाई मिळते पण, कासवगतीने

सोळा - गाव काटवान परिसरात दररोज कुठेना कुठेतरी बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडते. हल्ल्यात विशेषतः पाळीव प्राण्यांचा बळी जातो. वनविभागाला माहिती दिल्यावर वन कर्मचाऱ्यांकडून पंचनामाही केला जातो.

पंचनामा झाल्यावर वनविभागाच्या पिंपळनेर कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घटना घडल्याचे पत्र देण्यापासून तर मृत जनावरांचे शवविच्छेदन अहवालापर्यंतची सर्व कागदपत्रे सादर करण्याचा प्रवास मात्र नकोनकोसा वाटतो. कारण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वच गोष्टींची पुरेशी माहितीही नसते.

पिंपळनेर वन विभागाकडे अनेक नुकसानग्रस्त भरपाईसाठी डोळे लावून बसले आहेत. पिंपळनेर वनविभागात येणाऱ्या प्रत्येक गावात ग्रामपंचायत अथवा सार्वजनिक ठिकाणी स्थानिक वनकर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होतील अशी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. म्हसदीसह परिसरात बिबट्याचा वावर ही काही नवीन गोष्ट नाही.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

अनेक बिबटे, मादी, बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे वनविभागानेही मान्य केले आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला अशा क्षेत्रात बिबट्याच्या पावलांची ठसे आढळून येतात. इतकेच काय तर दोन वर्षांपूर्वी सापट्या शिवारात घराच्या छतावरून गाईवर बिबट्या हल्ला करत असतानाची घटना एका शेतकऱ्याने प्रत्यक्ष अनुभवली आहे.

वॉचमन करतात पंचनामे

पिंपळनेर वनविभागाच्या कार्यालयाकडे सर्वाधिक गावांचा समावेश आहे. शिवाय म्हसदीपासून शेंदवड - मांजरी पर्यंत हजारो हेक्टर वनक्षेत्र आहे. सुरक्षित वनक्षेत्र असल्याने याठिकाणी वन्यपशू बिबट्यासह तडस, हरणे, माकडे, कोल्हे, ससे, मोर, लांडगा यासारख्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे.

वनक्षेत्रलगत असलेल्या गावात बिबट्याचे दर्शन आणि हल्ला नित्यनेमाने होत असतो. बिबट्याच्या हल्ल्यानंतर वन विभागास माहिती दिल्यावर पंचनामा केला जातो. वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण असल्याने स्थानिक ठिकाणी असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना (वॉचमन) पंचनामा करावा लागतो. स्थानिक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. ते येईपर्यंत मृत जनावर सांभाळावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Assembly Election 2024: काटोल विधानसभा मतदारसंघ देशमुखांचाच?, पण कोणत्या?

AUS vs IND Test: बुमराला शांत ठेवा अन्‌ भारताविरुद्ध मालिका जिंका! कॅप्टन कमिन्सचा ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला

Devendra Fadnavis: विधानसभा जाहीर होताच फडणवीसांनी दिले शरद पवारांना चॅलेंज; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Gold Return: सोन्याची चमक वाढली; गेल्या एका वर्षात दिला 'गोल्डन रिटर्न', पहा 14 वर्षांचा इतिहास

Cleaning Tips: कमी वेळेत अन् जास्त मेहनत न घेता स्लायडिंग विंडो होतील स्वच्छ, फक्त वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT