Accident esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : अभियंता तरुणाला चारचाकी वाहनाने चिरडले

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शेतात पायी जाताना भरधाव चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील अभियंता तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (ता. २८) दुपारी दीडच्या सुमारास चिमठाणे-साळवे कच्च्या रस्त्यावर घडली.

रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. तो एकुलता असल्याने चिमठाणे गावावर शोककळा पसरली आहे. शिंदखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (young engineer crushed by four wheeler village of Chimthane mourned loss of only son Dhule News)

रविवारी दुपारी दीडच्या सुमारास चिमठाणे ते साळवे कच्च्या रस्त्यावर चारचाकी वाहना (एमएच १८, डब्ल्यू १२७३)ने प्रथमेश ऊर्फ पप्पू भीमराव अहिरे-धनगर (वय २३) चिमठाणे गावाकडून शेतात पायी जात असताना त्याला मागून जोराची धडक दिल्याने त्याच्या छातीला, पोटाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जमिनीवर पडला व चारचाकीचालक वाहन सोडून पळून गेला.

त्यानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेने चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दुपारी चार वाजून ५० मिनिटांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी प्रथमेश यास तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रथमेशचे चुलत काका संतोष हिलाल धनगर-अहिरे (वय ४९, व्यवसाय शेळी-मेंढी पालन) यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली.

पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सदेसिंग चव्हाण तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT