gaurav gagtap esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : तरुण उद्योजक जगताप यांचा डेंगीमुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : डेंगीमुळे येथील तरुण उद्योजक गौरव किशोर जगताप (वय ३७) यांचा नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (ता. १२) मध्यरात्री मृत्यू झाला.

या घटनेमुळे विविध क्षेत्रांत शोक प्रकट झाला.(Young entrepreneur dies due to dengue dhule news)

डेंगीमुळे उद्योजक जगताप यांच्या चटका देणाऱ्या निधनाची माहिती जिल्ह्यात समजताच शोक आणि चिंताही व्यक्त झाली. त्यांच्यावर शुक्रवारी (ता. १३) दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. डेंगीने यापूर्वी शहरातील मिल परिसरातील तरुणाचाही बळी घेतला.

या प्रकारामुळे संतप्त भावना उमटत आहेत. उद्योजक जगताप हे वाडीभोकर रोडवरील सुयोगनगरात शालिमार हाउस (प्लॉट नं. १९)मध्ये वास्तव्यास होते. नवनाथ स्पायसेस प्रायव्हेट लिमिटेड या अवधान शिवारातील ‘एमआयडीसी’त त्यांनी मसाला उद्योग सुरू केला.

या कंपनीच्या मसाल्याची चव दिल्लीपर्यंत पोहोचवली. त्यांनी देवपूरमध्ये श्री इच्छापूर्ती नवनाथ मंदिराचाही जीर्णोद्वार केला. गेल्या १७ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह त्यांनी सुरू ठेवला होता.

रक्तदान शिबिर, गरजू तरुणांना रोजगार आणि व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक हातभार, जिल्ह्यातील विविध मंदिरांसाठी स्वखर्चाने ३५४ पेक्षा अधिक देवी-देवतांच्या मूर्ती त्यांनी भेट दिल्या. तसेच, महादेवाच्या १२० पिंडी दान केल्या, १४ मंदिरे स्वखर्चाने बांधून दिली. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातच त्यांचे निधन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT