Murder esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : वैयक्तिक वादातून दिवसाढवळ्या तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : येथील एका व्यक्तीचा वैयक्तिक वादातून रविवारी (ता. ९) दुपारी अडीचच्या सुमारास दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. (youth was killed in broad daylight due to personal dispute nandurbar crime news)

या तरुणावर बंदुकीची गोळी झाडल्याचीही चर्चा आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या नातेवाइकास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात आला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील रहिवासी कृष्णा आप्पा पेंढारकर (वय ४०) याचा साक्री नाका परिसरातील उमापती महादेव मंदिराजवळ खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.

त्या ठिकाणी या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा हलवीत मृत तरुण शहरातील आंबेडकर चौकातील कृष्णा आप्पा पेंढारकर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पार्श्‍वभूमी जाणत या खून प्रकरणी मृत तरुणाचा नातेवाईक असलेल्या एका युवकास संशयावरून ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

घटनेची माहिती शहरात पसरताच मृत तरुणाचे नातेवाईक व संशयिताच्या नातेवाइकांनी नंदुरबार शहर व तालुका पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी संबंधितांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील काही भागात तत्काळ कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

धारदार शस्त्र व गोळी झाडून खुनाची शक्यता

दरम्यान, मृत तरुणाच्या अंगावरील खुनांच्या वर्णनावरून धारदार शस्त्राने वार करून तसेच गोळी झाडून हत्या केल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याचा चौकशीत खुनाचे कारण व कोणत्या शस्त्राचा वापर केला, हे कळू शकेल.

वैयक्तिक वादातून खून ः पी. आर. पाटील

दरम्यान, ही घटना नातेवाइकांमधील आपसातील वैयक्तिक वादातून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, खुनाचे कारण व कोणत्या शस्त्राचा वापर करून खून केला आहे हे वैद्यकीय अहवालावरून समजेल. नागरिकांनी या घटनेविषयी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT