Rakesh Salunkhe, Mahaveer Singh Rawal, Sangram Patil, Sanjay Patil and others present in Zilla Parishad School. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP News : विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे गुरुजी; दोंदवाडच्या मागणीची सीईओे गुप्ता यांच्याकडून दखल

सकाळ वृत्तसेवा

Dhule ZP News : दोंदवाड (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार झाली.

याप्रश्‍नी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत आंदोलन केले, तर तत्काळ एका शिक्षकाची नेमणूक करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई भदाणे यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांच्याकडे केली होती. (zp school got teacher dhule news)

त्याची दखल घेत सीईओंनी तत्काळ विद्यार्थ्यांना हक्काचे गुरुजी नियुक्तीतून दिले. दोंदवाड जिल्हा परिषद शाळेत संजय पोपट पाटील प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले.

त्या वेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती महावीरसिंग रावल, माजी कृषी सभापती संग्राम पाटील, दोंदवाडच्या उपसरपंच गंगूबाई माळी, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बिऱ्हाडे, विक्रम माळी, संजय बनसोडे, धर्मा माळी, कैलास माळी, हेमंत जाधव, बापूजी बोरसे, अनिल माळी, देवीदास शार्दूल, किरण पाटील, बापू माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बोरकुंड गटातील दोंदवाड जिल्हा परिषद शाळेत ७२ विद्यार्थी आहेत; परंतु फक्त दोन शिक्षक कार्यरत होते. तिसऱ्या शिक्षकाची मागणी केली जात होती. त्यात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकाच्या जागी नवीन शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या भदाणे यांनी केली होती.

''बोरीपट्ट्यासह धुळे तालुक्यातील ज्या मराठी शाळांत शिक्षकांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक होण्यासाठी वरिष्ठस्तरावर पाठपुराव्यातून प्रयत्न होतील, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही.''-शालिनीताई भदाणे, जिल्हा परिषद सदस्या, बोरकुंड गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT