Child Marriage : जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबतच आता राजकीय पदाधिकाऱ्यांचेही पाठबळ मिळत आहे. करवंद (ता.शिरपूर) येथे १८ एप्रिलला होणारा बालविवाह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे रोखला गेला.
श्री. पाटील यांच्या या तत्परतेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनीही कौतुक केले. राजकीय पदाधिकाऱ्यांनी असा पुढाकार घेतला तर जनतेचाही त्याला चांगला प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षाही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. (ZP Vice President Stopped Child Marriage initiative of officials along with government system dhule news)
धुळे जिल्हा बाल विवाहमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुबनेश्वरी एस. यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमास ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत.
या उपक्रमांतर्गत गावातील ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत असून काही प्रकरणात मुलीचे अथवा मुलांचे पालक कायदेशीर वयाबाबत चौकशी करत असल्याचा अनुभव आला आहे. दरम्यान, करवंद (ता. शिरपूर) येथे १८ एप्रिल २०२३ ला एका १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांना मिळाली होती.
त्यांनी तत्काळ पुढाकार घेऊन पोलिस पाटील, ग्रामसेवक तसेच पोलिस विभागाच्या सहकार्याने होणारा बालविवाह हळदीच्या दिवशीच रोखला. दरम्यान बालिकेचा जन्मपुरावा तपासणी केला असता बालिकेचे वय १६ वर्ष असल्याची खात्री पटल्यानंतर मुलाचे नातेवाईक व मुलीचे नातेवाईक यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार होणारी कार्यवाही याबाबत सर्वांना माहिती देण्यात आली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मुलाचे व मुलीचे पालक यांना बाल कल्याण समिती धुळे यांच्यासमोर उपस्थित राहण्याबाबत समज देण्यात आली. तसेच, मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत बालिकेचा विवाह करणार नाही असे संमतीपत्र मुलीच्या कुटुंबीयांकडून लिहून घेतले. ही कार्यवाही करताना पोलिस विभाग, करवंद गावाचे ग्रामसेवक युवराज शिवदास देसले, तसेच पोलिसपाटील उपस्थित होते.
१०९८ वर संपर्क साधा
बाल विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावर फोन केल्यास आपले नाव, पत्त्याची आवश्यकता नसून आपले नाव माहिती गोपनीय ठेवले जाते. त्यामुळे बाल विवाह होत असल्याची माहिती न घाबरता सर्वांनी द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. पाटील यांनी केले आहे..
दोषींना शिक्षेची तरतूद
बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. या वयाच्या आत मुला-मुलीचे लग्न केल्यास तो बाल विवाह मानला जातो व कायद्याने तो गुन्हा ठरतो व संबंधित दोषी शिक्षेस पात्र ठरतात असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.