धुळे : माझी वंसुधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ अंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘नो व्हेइकल’ तथा ‘सायकल डे’ पाळण्यात येतो. मध्यंतरी खंड पडलेला हा उपक्रम महापालिकेने पुन्हा सुरू केला. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह इतर काही अधिकारी-कर्मचारी मंगळवारी (ता. ६) महापालिकेत सायकलवर आले. (officials on cycle with commissioner Majhi Vasundhara Abhiyan activities starting again in Dhule Latest Dhule News)
हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
पर्यावरण संतुलन, प्रदूषणमुक्त शहरासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी महापालिकेने ‘नो व्हेइकल डे’ अर्थात ‘सायकल डे’ पाळण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी या उपक्रमांत खंड पडला. दरम्यान, मंगळवारपासून पुन्हा तो सुरू झाला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासाठी सायकलचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आयुक्त निवासस्थानापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांतर्फे सायकल फेरी काढण्यात आली.
प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तेथून अधिकारी-कर्मचारी धुळे महापालिकेत आले. प्रायोगिक तत्त्वावर सुरवात करण्यात आलेल्या या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात येईल. सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक संस्था यांच्या सहभागाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून धुळे शहर प्रदूषणमुक्त, चैतन्यमय करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे या वेळी आयुक्त देवीदास टेकाळे म्हणाले.
या उपक्रमात अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक अनिल साळुंखे, स्वच्छता निरीक्षक प्रमोद चव्हाण, महेंद्र ठाकरे, शुभम केदार, रूपेश पवार, गजानन चौधरी, मनीष आघाव, साईनाथ वाघ, राजेंद्र पाटील, संदीप मोरे, कैलास मासाळ, सुनील बर्गे, जुनेद अन्सारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.