काँग्रेसनं अहमद यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवलाय.
देहराडून : उत्तराखंड काँग्रेसनं (Uttarakhand Congress) मोठं पाऊल उचलत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अकील अहमद (Akil Ahmed) यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलंय. उत्तराखंड निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षानं (BJP) मुस्लीम विद्यापीठ (Muslim University) सुरू करण्याबाबत काँग्रेसनं केलेल्या वक्तव्यावरून अहमद यांना घेरलं होतं. त्यानंतर अहमद यांनी माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांच्यावर टीका केली होती आणि उत्तराखंडमधील (Uttarakhand Election) काँग्रेसच्या पराभवाला रावतच जबाबदार असल्याचं म्हंटलं होतं. आता पुन्हा हा वाद पेटला असून, रावत यांनी राजकारणातून संन्यास घ्यावं, असंही अहमद म्हणाले होते.
हरीश रावत यांच्यावर केलेल्या सततच्या टीकेनंतर काँग्रेसनं अकील अहमद यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांना पक्षाच्या पदांवरून, तसेच प्राथमिक सदस्यत्वावरून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केलीय. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मथुरादत्त जोशी यांनी एक पत्र जारी करत हा निर्णय घेतलाय. याची प्रत एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विटद्वारे प्रसिद्ध केलीय. हा तोच अकील अहमद आहे, ज्यांचं विधान निवडणूक प्रचारादरम्यान व्हायरल झालं होतं. त्यात ते उत्तराखंडमध्ये काँग्रेस मुस्लिम विद्यापीठ उघडणार असल्याचं सांगत होते. यासाठी त्यांनी हरीश रावत यांच्याशीही संवाद साधला होता.
जोशी यांनी जारी केलेल्या पत्रात अहमद यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. पक्षाच्या निर्देशानंतरही अहमद यांनी प्रसारमाध्यमांमध्ये बेताल वक्तव्य करणं सुरूच ठेवलं होतं. निलंबन करुन देखील अहमद हे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अशी विधानं करत राहिले, त्यामुळं पक्षाचं मोठं नुकसान झालंय. या आरोपासोबतच काँग्रेसनं आपल्या घटनेचा अहवाला देत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केलीय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.