UP Election 2022  UP Election 2022
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Election 2022 : ‘लव्ह जिहादसाठी १० वर्षांची शिक्षा’; भाजपचा जाहीरनामा

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने मंगळवारी जाहीरनामा (BJPs manifesto) प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी अनेक मोठे ठराव घेण्यात आले आहेत. भाजपने मुख्यतः कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी दोषींना किमान १० वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाचे आश्वासन दिले आहे.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने मंगळवारी जाहीरनामा (BJPs manifesto) प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी अनेक मोठे ठराव घेण्यात आले आहेत. भाजपने मुख्यतः कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी दोषींना किमान १० वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाचे आश्वासन दिले आहे.

पाच वर्षांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरकारने राजकारणाला गुन्हेगारीकरणापासून पूर्णपणे मुक्त करण्याचे काम केले आहे. तसेच उत्तर प्रदेशला प्रशासनाच्या राजकारणीकरणातूनही मुक्त केले. त्यामुळेच आम्ही आमच्या संकल्पपत्रातील सर्व वचने पूर्ण करू शकलो. गुन्हेगारीला आळा घालण्याचे हे काम भविष्यातही सुरूच राहणार आहे, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

भाजपने जाहीरनाम्यात (BJPs manifesto) शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर पाच हजार कोटींची कृषी सिंचन योजना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४ दिवसांत पैसे दिले जाणार, विलंब झाल्यास त्या रक्कमेवर व्याज दिले जाईल, राज्यातील प्रत्येक विधवा आणि निराधार महिलेला दर महिन्याला एक हजार ५०० रुपये पेन्शन मिळेल, सहा मेगा फूड पार्क तसेच पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीसह सरदार पटेल कृषी-पायाभूत सुविधा अभियान राबवण्यात येणार असल्याचे जाहीरनाम्यात (BJPs manifesto) उल्लेख आहे.

भाजपची मोठी आश्वासने

  • लव्ह जिहादमध्ये कमीत कमी १० वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा

  • गुंड, गुन्हेगार आणि माफियांविरुद्धची कारवाई सुरू राहणार

  • उत्तर प्रदेशातील सर्व १८ विभागांमध्ये भ्रष्टाचारविरोधी संस्था स्थापन करण्यात येणार आहेत

  • दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी देवबंदमध्ये दहशतवादविरोधी कमांडो केंद्राचे बांकाम पूर्ण केले जाईल

  • मेरठ, रामपूर, आझमगढ, कानपूर आणि बहराइचमध्ये असेच दहशतवादविरोधी कमांडो केंद्र उभारले जाईल.

  • राज्यातील पोलिस ठाण्यांमध्ये सायबर हेल्प डेस्क (CHD) स्थापन करण्यात येणार आहे.

  • भाजपने तीन नवीन महिला बटालियनचे नेटवर्क वाढवून ते दुप्पट करून महिलांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला आहे.

  • सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि शैक्षणिक संस्थांजवळ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत

  • ३,००० पिंक पोलिस बूथही उभारण्यात येणार आहेत.

आज सांयकाळी उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) पहिल्या टप्प्यातील प्रचार संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ११ जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्धनगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील ५८ जागांसाठी १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारीसह ३ आणि ७ मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : पुण्याच्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात रेवंत रेड्डीचं तेलगू भाषेत भाषण; मोदींवर केली टीका

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT