farzana shamshad Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Election: झोपडीतून प्रचार करणारी 'ही' उमेदवार कोण आहे? जाणून घ्या

त्यांनी गावातचं आपली एक झोपडी उभारली असून तिथून त्या काम करत आहेत.

दत्ता लवांडे

गाझीपूर : उत्तरप्रदेशमधाल निवडणुकांच्या प्रचाराला आता दिवसेंदिवस रंग भरताना आपल्याला दिसत आहे. आता फक्त दोन टप्प्यातील निवडणुका बाकी असून उद्या (ता. ३) आणि सात मार्च ला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांकडून मत मिळवण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जाताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे काही उमेदवार आश्वासनांचा भडीमार करत असून काहीजण साध्या राहणीमानात राहून जनतेत जाऊन आपला प्रचार करण्यात मग्न आहेत. (Uttarpradesh Assembly Election 2022 Updates)

असंच एक उदाहरण गाझीपूर जिल्ह्यातील जमानिया विधानसभेसाठी उभ्या असलेल्या कॉंग्रेसच्या एका महिला उमेदवारांचं आपल्याला पाहायला मिळेल. त्या सध्या जमानिया मधून विधानसभेसाठी उभ्या आहेत. त्या आपलं निवडणुक कार्यालय हे एका झोपडीतून चालवत आहेत. त्यांनी गावातचं आपली एक झोपडी उभारली असून तिथून त्या काम करत आहेत.

जमानीयामधील त्या महिला कॉंग्रेस उमेदवारांचं नाव आहे फरजाना शमशाद. त्यांचे पती अहमद शमसाद म्हणाले की, झोपडीतूनसुद्धा राजकारण झालं पाहिजे. जनतेत राहून प्रचार केला पाहिजे जेणेकरुन जनतेला आपला व्यक्ती असल्याची जाणीव झाली पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जनतेने कसलाच संकोच, भेदभाव न करता यावं. त्यांना वाटलं पाहिजे की, आपला मुलगा निवडणुक लढवत आहे." असं ते बोलताना म्हणाले.

गाझीपूरमधील जमानिया विधानसभेत एकदाही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही हा इतिहास आहे. या क्षेत्रात जास्तीत जास्त लोकसंख्या मुस्लिमांची आहे. अनेक वेळा मुस्लिम उमेदवारांनी येथून निवडणुक लढवली पण एकदाही विधानसभेत जायचा योग आला नाही. माहीतीनुसार येथे मुस्लिम मतदारांची लोकसंख्या एका लाखाच्या घराच आहे.

इतिहासाचे अभ्यासक अल दीमदार शम्सी या मतदारसंघाविषयी बोलताना म्हणतात की, येथे हिंदु मुस्लिम एकतेसाठी ओळखले जाते. दरम्यान यावर्षी येथे परत एकदा दोन मुस्लिम उमेदवार निवडणुक लढवत आहेत. जमानिया विधानसभेसाठी बसपा ने युसुफ फरीद उर्फ परवेज खान तसेच कॉंग्रेसने फरजाना शमसाद यांना तिकिट दिलं आहे. या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार निवडून येऊन इतिहास मोडेल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान गाझीपूरसह इतर नऊ जिल्ह्यातील मतदान हे सात मार्च ला होणार असून निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT