तुरुंगात असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान (Azam Khan) यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. 2022 च्या युपी विधानसभा (UP Election 2022) निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्यासाठी खान यांनी अंतरिम जामीन देण्याची मागणी केली होती, दरम्यान त्यांची ही याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत अंतरिम जामिनासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत. (Supreme Court Refuses Interim Bail To Azam Khan )
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात (Allahabad High Court) न्यायप्रविष्ट असल्याने हा अर्ज तेथेही दाखल करण्यात यावा. ते उच्च न्यायालयात जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती करू शकतात. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते खान यांनी जानेवारी महिन्यात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यांच्यावर राज्यात अनेक गुन्हे दाखल असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
उत्तर प्रदेशात 403 विधानसभेच्या जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार असून, पहिला टप्पा - 10 फेब्रुवारी दुसरा टप्पा- 14 फेब्रुवारी तिसरा टप्पा- 20 फेब्रुवारी चौथा टप्पा- 23 फेब्रुवारी पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी सहावा टप्पा- 3 मार्च तर, सातवा टप्पा- 7 मार्च रोजी पार पडणार असून, 10 मार्च रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत. (UP Assembly Election Latest News In Marathi)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.