Pandit Keshav Dev esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

शिवसेना पुरस्कृत उमेदवारानं गळ्यात बुटांचा हार घालून सुरु केला 'प्रचार'

सकाळ डिजिटल टीम

एका शिवसेना समर्थक उमेदवारानं विचित्र पद्धतीनं आपला निवडणूक प्रचार सुरू केलाय.

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशच्या अलिगढ विधानसभेतून निवडणूक लढवणाऱ्या (Aligarh Legislative Assembly of Uttar Pradesh) अपक्ष उमेदवारानं (Independent Candidate) विचित्र पद्धतीनं आपला निवडणूक प्रचार सुरू केलाय. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नुकतंच अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलंय. यात या साहेबांना बुटाचं चिन्ह मिळालंय. यानंतर हा अपक्ष उमेदवार गळ्यात चपलांचा हार घालून आपला प्रचार करताना दिसतोय.

पंडित केशव अलिगडमधून (Aligarh) 'अपक्ष' म्हणून निवडणूक लढवत आहेत. नगर 76 विधानसभा मतदारसंघातील अपक्ष व शिवसेना (Shiv Sena) पुरस्कृत उमेदवार पंडित केशव देव (Pandit Keshav Dev) यांनी भाजप नेत्यांवर धमकावल्याचा आरोप केलाय. काल (बुधवार) ते LIU कार्यालयात पोहोचले. तिथं त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं कारण देत दुसऱ्या बंदुकीची मागणी केलीय.

पंडित केशव प्रचारासाठी बाहेर पडतात, तेव्हा भाजपचे नेते त्यांच्या मागावर असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं आपल्या जीवाला धोका असल्यानं मी एलआययू कार्यालयात आलो असून दुसऱ्या बंदुकीची मागणी केलीय, असं त्यांनी सांगितलं. केशव पंडित यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केलीय. चपलांच्या हाराबाबत बोलताना ते म्हणाले, जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याला बुटांचा हार मी घालणार आहे. तसेच मी निवडून आल्यास उत्तर प्रदेशमधील भ्रष्टाचार संपवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT