CM Yogi Adityanath esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

इतर वाले मित्राने 'सबका साथ' वर हात साफ करून घेतला- योगींचा घणाघात

सपा सरकारने कोविड लसी कधीच बाजारात विकल्या- योगी आदित्यनाथ

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज संध्याकाळपर्यंत ते संपेल. या मतदानात भाजपच बाजी मारेल असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांनी समाजवादी पार्टीवर (SP) निशाणा साधला आहे. 'इतर वाले मित्रा'ने 'सबका साथ पर सर सफाई का विकास' वर लक्ष केंद्रित करून पैशाने तिजोरी भरवली आहे असा आरोप योगींनी (CM Yogi Adityanath) लगावला आहे. आज त्यांनी गोरखपूर (Gorakhpur) प्रचारा दरम्यान हल्लाबोल केला.

सपा सरकार असते तर कोविड लसी कधीच बाजारात विकल्या गेल्या असत्या कोणत्याही गरीबाला त्या मिळाल्या नसत्या.

समाजवादी पार्टीला टोला लगावताना योगी म्हणाले, सपा सरकार असते तर कोविड लसी कधीच बाजारात विकल्या गेल्या असत्या कोणत्याही गरीबाला त्या मिळाल्या नसत्या. याउलट भाजपने यापासून कोणीही वंचित राहू नये याची काळजी घेतली आहे असा टोला त्यांनी लगावला.

योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी उत्तर प्रदेशमधील आंबेडकरनगर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सपाचे अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यावर टीका केली. ५०० वर्षांपासूनचं आपलं स्वप्न आता पूर्ण होतंय. अयोध्येत रामंदिर होतंय. जी लोक रामभक्तांवर गोळीबार करायला लावत होते. आता तीच लोक हनुमानाची गदा घेऊन फिरतायंत. असंच सुरू राहिलं तर पुढील निवडणुकीपर्यंत रामभक्तांच्या रांगेत उभं राहून कारसेवा करतानाही दिसतील, असा टोला योगींनी लगावला.

कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये विनामूल्य कोरोना चाचणी आणि लस हे भाजपामुळेच शक्य झाले. सपा, बसपाची सत्ता असती तर त्यांनी लस विकली असती. आम्ही गरिबांना मोफत राशन दिलं. २०१७ पूर्वी असं चित्र नव्हतं. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व्हायचा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT