लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Assembly Election Result 2022) निकाल आज आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भाजपची (BJP) बहुमताच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. भाजपची आतापर्यंत २७० पेक्षा अधिक जागा आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) इतिहास घडवणार असल्याचं बोललं जात आहे.
५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून मुख्यमंत्री होणारे पहिले नेता -
उत्तर प्रदेशात भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येणारे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात असे कधीही घडलेले नाही. यापूर्वी यूपीमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत, परंतु त्यापैकी एकानेही पहिला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामध्ये संपूर्णानंद, चंद्र भानू गुप्ता आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्या नावांचा समावेश आहे.
३७ वर्षानंतर घडणार इतिहास? -
उत्तर प्रदेशात भाजपने सत्ता मिळवली तर ३७ वर्षानंतर इतिहास घडणार आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने १९८५ नंतर कोणालाही सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याची संधी दिली नाही. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी कोणालाही मिळाली नाही. पण, योगी आदित्यनाथ हे हाच रेकॉर्ड मोडणार असल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या कलावरून स्पष्ट होतंय.
निवडणूक लढवून मुख्यमंत्री होणारे दुसरे व्यक्ती -
2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा त्यांची सत्ता येण्याच्या मार्गावर आहे. योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि गोरखपूर मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते. 2003 नंतर पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर एखादा नेता मुख्यमंत्री होणार आहे. यापूर्वी 2003 मध्ये मुलायमसिंह यादव आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री बनले होते. आतापर्तंय मायावती 2007 मध्ये मुख्यमंत्री झाल्या, पण निवडणूक न लढवता. 2012 मध्ये अखिलेश यादव आणि 2017 मध्ये योगी आदित्यनाथ हे देखील विधान परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले. यावेळी योगी आदित्यनाथ स्वतः निवडणूक लढवत आहेत.
योगींनी तोडले गैरसमज -
उत्तर प्रदेशात आतापर्यंत नोएडाला जाणार्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची सुरक्षित नसल्याचे मानले जात आहे. त्यांची सत्ता परत येत नाही, असंही बोललं जातं. त्यामुळे यापूर्वी झालेल्या काही मुख्यमंत्र्यांनी नोएडाला जाणे टाळले आहे. विविध कार्यक्रमासंदर्भात काहींना तिथे जाण्याची संधी मिळाली. पण, त्यांनी दिल्लीवरून हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण, योगी मात्र नोएडाला गेले. आता ते परत सत्तेत आल्यानंतर नक्कीच हा गैरसमज तोडणार आहेत.
मुख्यमंत्रिपदाबाबतचा हा गैरसमज १९८८ पासून -
नोएडाला गेल्यावर मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते हा 1988 पासूनचा समज आहे. वीर बहादूर सिंग हे राज्याचे मुख्यमंत्री होते. ते नोएडाला गेले आणि योगायोगाने त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली. नारायण दत्त तिवारी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 1989 मध्ये नोएडा येथील सेक्टर-12 येथील नेहरू पार्कचे उद्घाटन करण्यासाठी ते गेले होते. काही काळानंतर निवडणुका झाल्या, पण ते काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणू शकले नाहीत. यानंतर कल्याण सिंह आणि मुलायमसिंह यादव यांच्याबाबत असेच घडले. भाजप पुन्हा निवडणूक जिंकल्यास योगी आदित्यनाथ हा समज मोडतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.