सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांना मतदानात सहभागी होण्याचं आवाहन केलंय.
समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) अध्यक्ष जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनी आज (सोमवार) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) दुसऱ्या टप्प्यात मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. आजच्या 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) दिवशी जयंत यांनी मतदारांना प्रेम आणि सौहार्दाला मतदान करा, असं सांगितलंय.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांना मतदानात सहभागी होण्याचं आवाहन केलं. सोशल मीडियावरील (Social Media) आपल्या संदेशात अखिलेश यांनी जेवढं जास्त मतदान कराल, तितकी लोकशाही मजबूत होईल. मतदान करा, असं सांगितलंय. या निवडणुकीत सपासोबत युती करणारे राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) अध्यक्ष जयंत चौधरी यांनी 'व्हॅलेंटाईन डे' या दिवसाचा उल्लेख करत मतदारांना प्रेम, बंधुता आणि विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलंय. जयंत यांनी ट्विट केलंय की प्रेम, सौहार्द, बंधुता आणि विकासासाठी आज मतदान करा. या ट्विटसोबत #UPElections2022 #ValentinesDay2022 हा हॅशटॅगही जयंत यांनी दिलाय.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेश आणि रुहेलखंड प्रदेशातील 9 जिल्ह्यांत 55 जागांवर आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झालीय. सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणाऱ्या मतदानात 2.01 कोटी मतदार आज 69 महिला उमेदवारांसह 586 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.