Akhilesh Yadav Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Election: भाजपाला पाठवा 'सात समुंदर पार' : अखिलेश यादव

आझमगढ येथील प्रचारसभेत अखिलेश यादव बोलत होते.

दत्ता लवांडे

आझमगढ : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या देशातील पाच राज्यांत सुरु आहे. गोवा, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात निवडणुका चालू आहेत. उत्तरप्रदेशमध्ये सध्या या निवडणुका सात टप्प्यात होणार असून सहा टप्प्यातील मतदान झालं आहे. सातव्या टप्प्यातील मतदान हे ७ मार्च रोजी होणार असून या टप्प्यात ९ जिल्ह्यांचा सामावेश आहे.

आझमगढ, माऊ, गाझीपूर, जौनपूर, चंदौली, वाराणसी, भांडोही, मिर्झापूर, सोनभद्रा या नऊ राज्यांत या टप्प्यातील मतदान होणार आहे. सात तारखेला मतदान होणार असून १० मार्च ला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. उत्तरप्रदेशमधील ७५ जिल्ह्यात ४०३ जागांसाठी ही निवडणुक होणार असून या निवडणुकांच्या मतदानाचा पहिला टप्पा हा १० फेब्रुवारीला झाला होता. हा शेवटचा टप्पा असून प्रत्येक राजकीय नेत्यांनी आपला प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. उत्तरप्रदेशमध्ये सध्या समाजवादीचे अखिलेश यादव आणि भाजपाचे योगी आदित्यनाथ यांच्यात लढत होणार आहे. इतर पक्षही रिंगणात उतरले असून त्यांनीही जोरदार प्रचार केला आहे.

दरम्यान प्राचारसभेच्या वेळी समाजवादीचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका करताना "सातव्या टप्प्यातील मतदानात आझमगढची जनता भाजपाला 'सात समुंदर पार' पाठवेल. आमचे सरकर आल्यावर आम्ही पोलिस भरती आणि सैन्य भरती घेऊ." आझमगढ येथील प्रचारसभेत अखिलेश यादव बोलताना म्हणाले.

शेवटच्या टप्प्यातील मतदान दोन दिवसांवर आले असून मतदाराला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. एकमेकांवर आरोपाच्या झोडी उठवणं चालूच आहे. त्यातच जनतेला पोलिस आणि सैन्य भरतीचे आश्वासन देउन अखिलेश यांनी मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर भाजपाला सात समुंदर पार पाठवा असाही संदेश दिला.

योगी आदित्यनाथ हे अशिलेश यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असून त्यांनीही चांगलाच प्रचार केला आहे. १० मार्च ला मतमोजणी होणार असून त्यानंतर सत्तेची चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT