UP Assembly Election Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Assembly Election: भाजपला ४७ जागा मिळतील; स्वामीप्रसाद यांचा दावा

स्वामी प्रसाद मौर्य हे राज्यातील ओबीसी नेते मानले जातात.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : भाजप सोडून समाजवादी पक्षाच्या तंबूत दाखल झालेले माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेशात भाजपला २०१२ च्या निवडणुकीप्रमाणेच म्हणजेच ४७ जागा मिळतील, असा दावा केला आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या आघाडीला उत्तर प्रदेशात दणदणीत यश मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. (UP Assembly Election Updates)

स्वामी प्रसाद मौर्य हे राज्यातील ओबीसी नेते मानले जातात. विधानसभा निवडणुकीत भाजप २०१२ च्या आकड्यावर येईल, असे ते म्हणाले. मौर्य म्हणाले की, १० मार्चच्या निकालानंतर राज्यातील ओबीसी भाजपसवेत आहे की नाही, हे देशाला कळून चुकेल. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल काय, असे विचारले असता ६८ वर्षीय मौर्य म्हणाले की, पद मिळवणे हे ध्येय नसून गरीब, मागासवर्गीय, दलित घटकांची सेवा करणे आणि त्यांना पुढे नेणे हाच आपला विचार राहिलेला आहे. कोण उपमुख्यमंत्री होणार आणि कोणाला मंत्रिपद मिळणार हा मुद्दा महत्त्वाचा नसून उत्तर प्रदेशला भाजपपासून कशी मुक्ती मिळेल आणि त्यांना सत्तेपासून दूर कसे ठेवता येईल, हाच खरा मुद्दा आहे.

कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलपूर मतदारसंघातून स्वामीप्रसाद मौर्य निवडणूक लढवत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करणारे आरपीएन सिंह यांच्यापासून धोका असल्यानेच मतदारसंघात बदल करावा लागल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. स्वामीप्रसाद मौर्य यांनी अगोदर पौडरोना येथून निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाच्या रणनितीनुसार मतदारसंघात बदल करण्यात आल्याचे मौर्य म्हणाले. ते म्हणाले, की आरपीएन सिंह कोणती निवडणूक लढवत आहेत, मला सांगा. अर्थात ते रिंगणात उतरलेले नाहीत आणि जरी उतरले तरी आमचा उमेदवार त्यांना पराभूत करेल, असा विश्‍वास आहे. भाजपकडून राष्ट्रवादाचे स्लोगन केले जात असले तरी प्रत्यक्षात ‘८०-२० चे स्लोगन पुढे आणले जात असून या माध्यमातून समाज आणि देशात फुटीचे बीज रोवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप मौर्य यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT