UP assembly Election Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP: योगींच्या सभांचे द्विशतक; अखिलेश, प्रियांका गांधी यांचे रॅलीचे शतक

उत्तर प्रदेशची रणधुमाळी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाने सोमवारी थंडावली.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : उत्तर प्रदेशची रणधुमाळी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाने सोमवारी थंडावली. उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा आखाडा जिंकण्यासाठी स्टार प्रचारकांनी एका एका दिवसांत अनेक सभा घेतल्या, रथयात्रा काढल्या, पदयात्रा काढली, सातही टप्प्यांचा आढावा घेतल्यास भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकूण दोनशेहून अधिक सभा घेतल्या. सप नेते अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी सभांचे शतक ठोकले. तर बसपच्या नेत्या मायावती यांनी विभागनिहाय सभा घेतल्या.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य प्रचाराने पिंजून काढले. शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांनी सातव्या टप्प्यापर्यंत दोनशेहून अधिक सभा घेतल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ५ मार्चला पाच सभा घेतल्या. तत्पूर्वी एका एका दिवसात त्यांनी सात सात सभा घेतल्या. एवढेच नाही तर योगींनी उत्तराखंडमध्ये देखील सभा केल्या.

पंतप्रधान मोदींच्या २७ सभा

उत्तर प्रदेशचा भाजपचा प्रचार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रस्थानी राहिला. त्यांनी २७ सभा आणि रोड शो केले. त्याचवेळी गृहमंत्री अमित शहा यांनी ६१ सभा आणि रोड शो केले.भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ४१, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी देखील सभांचे शतक ठोकले. उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी ४० हून अधिक सभा घेतल्या.

अखिलेश यादव यांचा जोरात प्रचार

सप नेते अखिलेश यादव यांनी सत्ता खेचून आणण्यासाठी जोरात प्रचार केला. त्यांनी ११७ सभा घेतल्या आणि १४ रथयात्रेत सहभाग घेतला. १३ फेब्रुवारीनंतर ते दररोज दोन ते तीन जिल्ह्यांत सभा घेत होते. एक ते पाच मार्च यादरम्यान त्यांनी सर्वाधिक सभा जौनपूर येथे तर आझमगड येथे दोन सभा घेतल्या.

काँग्रेसचा प्रचार प्रियांका केंद्रितच

काँग्रेसची प्रचार यंत्रणा ही संपूर्णपणे प्रियांका गांधी केंद्रित राहिली. त्यांनी १४७ सभा घेतल्या. तर राहुल गांधी यांनी केवळ दोनच सभा घेतल्या. प्रियांका गांधी यांनी ४२ सभा घेतल्या तर ‘डोअर टू डोअर’ अभियानही केले. याशिवाय छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट देखील उत्तर प्रदेशात सक्रिय होते. राहुल गांधी यांनी जगदीशपूर येथे आणि वाराणसीच्या पिंडरा क्षेत्रात सभा घेतल्या. भूपेश बघेल, सचिन पायलट, दीपेंद्र हुड्डा यांनी पश्‍चिम उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित केले.

मायावती, जयंत यांच्या १८-१८ सभा

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी १८ जिल्ह्यांत विभागनिहाय सभा घेतल्या. त्यांनी पंजाब व उत्तराखंडमध्ये देखील सभा घेतल्या. बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्र यांनी देखील प्रचाराची जबाबदारी सांभाळली. दुसरीकडे रालोदचे नेते जयंत सिंह चौधरी यांनी चौदा सभा घेतल्या. याशिवाय एमआयएमचे नेते असदद्दुदीन ओवेसी यांनी देखील अनेक ठिकाणी सभा घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT