Yogi Adityanath Yogi Adityanath
Uttar Pradesh Assembly Election 2022

योगींच्या सरकारमध्ये चार उपमुख्यमंत्री! २० मार्चनंतर नवीन सरकार?

सकाळ डिजिटल टीम

विधानसभेच्या ४०३ पैकी २७३ जागा जिंकणारा भाजप उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. तब्बल ३७ वर्षांनंतर इतिहास रचणाऱ्या भाजपने योगींच्या शपथविधीची तयारी केली आहे. २० मार्चनंतर नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. होळीनंतर योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. नव्या सरकारमध्ये (New Government) आणखी दोन उपमुख्यमंत्री वाढवले ​​जाऊ शकतात. म्हणजेच दोन ते चार उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चार उपमुख्यमंत्र्यांमध्ये तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय योगींच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांचाही समावेश होऊ शकतो. होळीनंतर स्थापन होणाऱ्या योगींच्या नव्या सरकारमध्ये भाजपच्या नव्या आमदारांना मंत्रीपदे देण्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा आहे. यातील पहिले नाव संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांचे आहे. पंकज नोएडातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय असीम अरुण, नितीन अग्रवाल यांना मंत्रिपद देण्याची चर्चा आहे. महेंद्र सिंह, सिद्धार्थनाथ सिंह, श्रीकांत शर्मा अशा अनेक आमदारांना पुन्हा जबाबदारी दिली जाऊ शकते.

सिरथू विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या (BJP) तिकिटावर निवडणूक लढवलेले केशव प्रसाद मौर्य सपा उमेदवाराकडून पराभूत झाले. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगींच्या नव्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. यूपीमध्ये प्रचंड बहुमत मिळवून सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणाऱ्या भाजपने योगी मंत्रिमंडळात स्वतंत्रदेव सिंह यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी नव्या सरकारमध्ये चार उपमुख्यमंत्री असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी एक पद स्वतंत्रदेव सिंह यांनाही दिले जाऊ शकते.

योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमासाठी भाजप संघटनेने काही तारखा केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. नवी दिल्लीत या संदर्भात बैठक झा. ज्यामध्ये शपथविधीच्या तारखेवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल. १३ मार्चपासून दिल्लीत उत्तर प्रदेश संघटनेसोबत बैठकीची फेरी सुरू होणार आहे.

मोदी-शहा होणार शपथविधी!

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पुन्हा योगी सरकार आले आहे. शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मोठे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Satara Election result : शंभूराज, मकरंद, शिवेंद्रसिंहराजे चर्चेत, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतरच मंत्रिमंडळाचा निर्णय?

"कोण किशोर कुमार ?" आलियाच्या प्रश्नाने रणबीरला बसला धक्का ; म्हणाला...

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : मोठी बातमी! ..अखेर एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT